ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: देवरुख पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांची महत्त्वाची बैठक संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » देवरुख पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांची महत्त्वाची बैठक संपन्न
संगमेश्वर

देवरुख पोलीस ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांची महत्त्वाची बैठक संपन्न

Gramin Varta
Last updated: October 4, 2026 5:07 pm
Gramin Varta
57 Views
Share

देवरुख/सिकंदर फरास : आगामी नवरात्रोत्सव शांततापूर्ण व सुव्यवस्थित वातावरणात पार पाडण्यासाठी काल देवरुख पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक व खाजगी नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली. त्यावेळी लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि देवरुख पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सायंकाळी ४.३० ते ५.३० दरम्यान ही बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीमध्ये आगामी उत्सवाच्या अनुषंगाने प्रशासनाकडून काही महत्त्वपूर्ण नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व मंडळांनी उत्सवाचे योग्य नियोजन करून आपली नियोजन पत्रिका तात्काळ पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच उत्सव काळात ध्वनी प्रदूषणाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करतच ध्वनीक्षेपकाचा वापर करावा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्युत वायरिंगची तपासणी अधिकृत व्यक्तीकडून करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पार्किंगची चोख व्यवस्था राखणे, कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर किंवा धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारे मजकूर अथवा चित्रण न लावणे यावर भर देण्यात आला. तसेच सोशल मीडियावर कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित रील्स आणि व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

धार्मिक रितीरिवाजांनुसार हा उत्सव शांततेत पार पाडावा आणि कार्यक्रमात काही बदल असल्यास त्याची पूर्वकल्पना पोलीस ठाण्याला देण्यात यावी असे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय, विसर्जन मिरवणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा अनुचित घटना घडणार नाही याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.बैठकीच्या शेवटी पोलीस अधिकाऱ्यांनी मंडळ पदाधिकाऱ्यांच्या अडचणी आणि शंका जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.यावेळी उपनिरीक्षक वाघाटे,पोलिस हवालदार सागर मुरुडकर आणि मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Total Visitors :

5435504
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात; केमिकल टँकर २५० फूट दरीत कोसळला, चालक सुखरूप बचावला

Gramin Varta
2 Min Read

मालगुंड ग्रामपंचायतीत जयगड पोलिसांचा सायबर जनजागृती उपक्रम; ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत नागरिकांशी थेट संवाद

Gramin Varta
2 Min Read

पत्रकार प्रविण कांबळे लिखित-दिग्दर्शित ‘नाडा’ एकांकिकेने मुंबईकरांची मने जिंकली

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर परिसरात गौरी-गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन; चाकरमान्यांच्या उपस्थितीने कोकण फुलले

2 Min Read
संगमेश्वर

कोकणातील उद्योग-रोजगाराच्या प्रश्नांवर विचार मांडण्याची संधी

3 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : पांचाबे येथे आढळला कुजलेला नर बिबट्याचा मृतदेह आढळला

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?