ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूणमध्ये गॅस सिलेंडरच्या वादातून परप्रांतीय तरुणाला मारहाण; लोखंडी रॉडने डोक्यात व खांद्यावर वार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूणमध्ये गॅस सिलेंडरच्या वादातून परप्रांतीय तरुणाला मारहाण; लोखंडी रॉडने डोक्यात व खांद्यावर वार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण

चिपळूणमध्ये गॅस सिलेंडरच्या वादातून परप्रांतीय तरुणाला मारहाण; लोखंडी रॉडने डोक्यात व खांद्यावर वार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 23, 2026 9:39 am
Gramin Varta
120 Views
Share

चिपळूण : गॅस सिलेंडर देण्यावरून झालेल्या वादातून भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पश्चिम बंगालमधील एका ४२ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील बळवंत पाटील विकासवाडी परिसरात घडली. या मारहाणीत सहीदुल अमीरुद्दीनमिया हक हे जखमी झाले असून, या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. फिर्यादी सहीदुल अमीरुद्दीनमिया हक (वय ४२, मूळ रा. उनिसबिशा, ता. घोकशादंगा, जि. कुचबिहार, पश्चिम बंगाल) हे सध्या खेर्डी येथील बळवंत पाटील विकासवाडी परिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. घटनेच्या वेळी ते जेवण करून आपल्या खोलीत आराम करत होते. त्याचवेळी अब्बास मिया (वय ४७), मनिजा बीबी (वय ४५) आणि राजीव मिया (वय २१, सर्व रा. खेर्डी, ता. चिपळूण) हे त्यांच्या खोलीत आले. त्यांनी फिर्यादींकडे वापरात असलेला गॅस सिलेंडर तातडीने देण्याची मागणी केली.

फिर्यादी यांनी एक दिवसाची मुदत देण्याची विनंती करत दुसऱ्या दिवशी सिलेंडर देतो, असे सांगितले. मात्र, यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तात्काळ सिलेंडर देण्याचा आग्रह धरला. यावेळी आरोपी अब्बास मिया याने स्वयंपाकघरातील मसाला कुटण्याचा लोखंडी रॉड घेऊन फिर्यादींच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. त्यानंतर राजीव मिया याने अब्बासच्या हातातील रॉड घेऊन फिर्यादींच्या डाव्या खांद्यावर वार केला. दरम्यान, अब्बास मिया याच्या पत्नीने घरातील झाडूने मारहाण करण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १ वाजून ५५ मिनिटांनी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5469363
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पाली येथे भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

गुहागर पंचायत समितीतील विकासकामांच्या कथित गैरव्यवहाराविरोधात शेतकरी संघ आक्रमक; १३ ऑक्टोबरला आमरण उपोषणाचा इशारा

Gramin Varta
2 Min Read

दिल्लीतील आंदोलनांमुळे १० दिवसांत व्यापाऱ्यांना ४ हजार कोटींच्या नुकसानाचा अंदाज

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी शहरात १२ ऑक्टोबरपासून पाणी कपात; दर सोमवारी पुरवठा बंद, वेळेतही १५ मिनिटांची घट

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण: कापसाळ येथे दुचाकी घसरून महिला जखमी

1 Min Read
चिपळूण

Keyboard Startup Introduces Innovative Layout for Enhanced Productivity

7 Min Read
चिपळूण

चिपळूण : कोळकेवाडीत घर फोडून तांब्या पितळेची भांडी चोरीला

2 Min Read
चिपळूण

सावर्डे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?