ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गुहागर पंचायत समितीतील विकासकामांच्या कथित गैरव्यवहाराविरोधात शेतकरी संघ आक्रमक; १३ ऑक्टोबरला आमरण उपोषणाचा इशारा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गुहागर पंचायत समितीतील विकासकामांच्या कथित गैरव्यवहाराविरोधात शेतकरी संघ आक्रमक; १३ ऑक्टोबरला आमरण उपोषणाचा इशारा
गुहागर

गुहागर पंचायत समितीतील विकासकामांच्या कथित गैरव्यवहाराविरोधात शेतकरी संघ आक्रमक; १३ ऑक्टोबरला आमरण उपोषणाचा इशारा

Gramin Varta
Last updated: October 13, 2026 10:54 am
Gramin Varta
50 Views
Share

गुहागर: गुहागर पंचायत समिती अंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध शासकीय विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत शिवस्वराज्य शेतकरी संघाने थेट प्रशासनाविरोधात दंड धोपटले आहेत. नळपाणी योजना, ग्रामपंचायत इमारती, सार्वजनिक शौचालये आणि शेतकरी योजनांच्या निधी वापरातील कथित गैरव्यवहारांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोविंद भोजने यांनी गुहागर तहसीलदारांना निवेदन सादर केले असून, मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुकारण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

मासू खुर्द परिसरातील नळपाणी पुरवठा योजना गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प असल्याने स्थानिक नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या जुन्या व नवीन इमारतींचे बांधकाम, जनसुविधा योजनेतून खर्ची पडलेला अंदाजे दोन लाख रुपयांचा निधी, शौचालय उभारणीवर खर्च झालेले सुमारे तीन लाख रुपये, तसेच विहिरी, साठवण टाक्या आणि जलवाहिन्यांच्या कामांवर झालेल्या खर्चाच्या विश्वासार्हतेवर निवेदनातून थेट बोट ठेवण्यात आले आहे. प्रत्यक्ष जमिनीवर कामे अपूर्ण असतानाही कागदोपत्री ती पूर्ण दाखवून शासकीय तिजोरीतून निधी उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर आणण्यासाठी संबंधित कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी, तसेच मंजूर अंदाजपत्रके, मोजमाप पुस्तिका (एमबी रेकॉर्ड), ठेकेदारांची बिले आणि देयकांची कसून छाननी करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा प्रत्यक्ष दर्जा आणि शेती अवजारांच्या खरेदी व्यवहारांचीही तांत्रिक व आर्थिक तपासणी करण्याची मागणी निवेदनात समाविष्ट आहे. शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या घटकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी भूमिका शेतकरी संघाने घेतल्याने आता या संवेदनशील प्रकरणावर गुहागर तालुका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.

Total Visitors :

5469136
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यात अनधिकृत बांधकामांच्या दस्तनोंदणीवर अखेर बंदी; फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक रोखण्यासाठी राज्य सरकारचे कठोर पाऊल

Gramin Varta
2 Min Read

मतदार यादीतील घोळाविरोधात आज राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयावर धडकणार

Gramin Varta
2 Min Read

राष्ट्रवादीच्या सहा बड्या नेत्यांची घेतली अमित शाहांची भेट

Gramin Varta
3 Min Read

सत्तेचा झगमगाट बाजूला ठेवून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा अंबवलीत ‘आपुलकीचा मुक्काम’; माजी सैनिकाच्या कौलारू घरात साधला ग्रामस्थांशी थेट संवाद

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

गुहागर

गुहागर : एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटून भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने चार प्रवासी जखमी

2 Min Read
गुहागर

गुहागर : वेळणेश्वर येथे अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

1 Min Read
गुहागर

पुण्याच्या प्रतिष्ठित मॅरेथॉनमध्ये गुहागरच्या अनंत तानकरांची ऐतिहासिक कामगिरी; २१ किमी शर्यतीत पटकावला द्वितीय क्रमांक

1 Min Read
गुहागर

लोकशाही वाचवा, अराजकता हटवा अभियानांतर्गत गुहागर येथे ‘राष्ट्र चिंतन संवाद’ कार्यक्रम उत्साहात संपन्न!

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?