ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राष्ट्रवादीच्या सहा बड्या नेत्यांची घेतली अमित शाहांची भेट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राष्ट्रवादीच्या सहा बड्या नेत्यांची घेतली अमित शाहांची भेट
देश-विदेश

राष्ट्रवादीच्या सहा बड्या नेत्यांची घेतली अमित शाहांची भेट

Gramin Varta
Last updated: November 3, 2026 7:55 am
Gramin Varta
264 Views
Share

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीची चर्चा

दिल्ली: महाराष्ट्रातील आगामी राजकीय रणनीती आणि मंत्रिमंडळातील खातेवाटपात स्थान मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सहा प्रमुख नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली आहे.

या भेटीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता. महत्वाचे म्हणजे या महत्त्वपूर्ण बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणे, संघटनात्मक परिस्थितीवर चर्चा करणे आणि आगामी राजकीय रणनीती आदी मुद्यांवर चर्चा झाल्याचमी माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याच्या आणि पक्षात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या पूर्णपणे असत्य, बिनबुडाच्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले.

उमेश पाटील यांनी पुढे स्पष्ट केले की, अमित शाह यांच्यासोबत झालेली ही बैठक अचानक ठरलेली नव्हती तर तिचे नियोजन आधीच झाले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी स्वतः दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. त्याच बैठकीदरम्यान, पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांचे एक शिष्टमंडळ लवकरच भेट घेईल, असे सुनेत्रा पवार यांनी शाह यांना सांगून ही वेळ मागून घेतली होती. या बैठकीत नेत्यांनी पक्षाचे संघटन, महाराष्ट्रातील विविध विकासकामे आणि आपापल्या मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. याशिवाय, दिल्लीत उपस्थित असलेल्या महायुतीच्या इतर घटक पक्षांतील नेत्यांसोबतही अनौपचारिक संवाद साधण्यात आला, अशी माहिती पाटील यांनी दिली.

काही घटकांकडून या औपचारिक भेटीला विनाकारण राजकीय रंग देण्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी हा महायुतीचा एक महत्त्वाचा आणि मजबूत घटक पक्ष असून, सुनेत्रा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण पक्ष एकसंधपणे काम करत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पक्षातील अंतर्गत कलहाच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले होते. पक्षात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांमध्ये विजय आणि पराभव होत असतात. मात्र, पराभव झाल्यानंतर आत्मपरीक्षण करणे आवश्यक असून, पक्ष निश्चितपणे त्यावर विचार करेल, असेही त्यांनी सांगितले होते.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सिलिंडर ६३ रुपयांनी महागला

Gramin Varta
1 Min Read

कोकणची लोककला आणि भजन परंपरा जपणार्‍या निढळेवाडीतील तीन बालगायिकांचा विशेष सन्मान

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण : खेर्डी एमआयडीसीतील फर्निचर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

गुहागर: दुसरीतील चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला जन्मठेप

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी याच्यावर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, घरातून घेतलं ताब्यात

2 Min Read
देश-विदेश

‘लहरा दो तिरंगा’ यात्रेपूर्वी अभिजीत दिपके आणि नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात

3 Min Read
देश-विदेश

१९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

3 Min Read
देश-विदेश

तृणमूल काँग्रेसचे नाव व निवडणूक चिन्ह गोठवले; ममता -ऋतब्रत गटांकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी नावे सादर

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?