ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आंतरराष्ट्रीय परिषद व केंद्रीय संमेलनाच्या नियोजनासाठी मालगुंड ‘कोमसाप’ची उद्या विशेष सभा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आंतरराष्ट्रीय परिषद व केंद्रीय संमेलनाच्या नियोजनासाठी मालगुंड ‘कोमसाप’ची उद्या विशेष सभा
रत्नागिरी

आंतरराष्ट्रीय परिषद व केंद्रीय संमेलनाच्या नियोजनासाठी मालगुंड ‘कोमसाप’ची उद्या विशेष सभा

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 2:48 pm
Gramin Varta
13 Views
Share

गणपतीपुळे (वैभव पवार): रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखेच्या वतीने उद्या, रविवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी एका महत्त्वपूर्ण विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कवी केशवसुत स्मारक सभागृहात सायंकाळी चार वाजता शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार असून आगामी साहित्यिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या सभेसाठी कोमसाप कार्यकारिणी सदस्य, कवी केशवसुत स्मारक समिती सदस्य, मालगुंड ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ब. प. विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

या सभेमध्ये प्रामुख्याने आगामी २३, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या बहुचर्चित ‘अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषदे’च्या पूर्वतयारीची सविस्तर माहिती देऊन रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. तसेच येत्या २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे रंगणाऱ्या ‘केंद्रीय साहित्य संमेलना’च्या नियोजनावरही या बैठकीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार असून गठीत करण्यात आलेल्या विविध समित्या आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांवर सखोल चर्चा करण्यात येईल.

याशिवाय मालगुंडमध्ये साकारल्या जाणाऱ्या ‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमांतर्गत मंजूर झालेल्या निवडक दालनांबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये ब. प. विद्यालय मालगुंड, संस्थान श्री देव गणपतीपुळे, बुद्धविहार मालगुंड, अमित प्रभाकर मेहंदळे, निनाद श्रीकर कोसुंबकर, मोरेश्वर गोविंद मुळ्ये, शेखर मधुकर खेऊर, आर. डी. सी. सी. बँक मालगुंड, आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नं. १ आणि प्रभाकर मोरेश्वर घनवटकर या दहा मंजूर दालनधारकांना या बैठकीस न चुकता उपस्थित राहण्याचे सूचित करण्यात आले आहे. साहित्याची ही मोठी पर्वणी यशस्वी करण्यासाठी कोमसाप कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी व संबंधितांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसाप मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर आणि सचिव विलास राणे यांनी केले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

AI Unleashed Exploring the Future of Machine Learning and Robotics

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!

Gramin Varta
2 Min Read

डोंगर पोखरणीने सह्याद्री ठिसूळ; रत्नागिरी-नागपूर महामार्गावर पन्हाळा ते हातखंबा पट्ट्यात वाढला भूस्खलनाचा धोका

Gramin Varta
3 Min Read

महिला शेतकऱ्यांना अधिकृत सन्मान; राज्यभरात प्रमाणपत्र नोंदणी व वितरणाची धडक मोहीम सुरू, १७ ऑक्टोबरपर्यंत संधी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मांडवी समुद्रकिनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’ संपन्न;2.5 टन कचरा संकलित

3 Min Read
रत्नागिरी

Tech Evolution Unveiling Insights in the Realm of Innovation

7 Min Read
रत्नागिरी

निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा वर्तक कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा

2 Min Read
रत्नागिरी

वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?