गणपतीपुळे (वैभव पवार) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, नुकत्याच पार पडलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्यावर कोतवडे विभागातील वरची निवेंडी गावी आरपीआयच्या नवीन गाव शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी आरपीआयचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष मंगेश सावंत यांच्या हस्ते शाखेच्या अधिकृत नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी माजी तालुका अध्यक्ष विजय आयरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पक्ष संघटना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना तालुका अध्यक्ष मंगेश सावंत यांनी नवनियुक्त विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष व कार्यकर्त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी काळात प्रत्येक गावात पक्षाच्या शाखांची स्थापना करून आरपीआयची संघटनात्मक पाळेमुळे घट्ट व मजबूत करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
या कार्यक्रमाला आरपीआयचे रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष सुनील कांबळे, उपाध्यक्ष सुगंध कदम, सहसचिव नरेश कांबळे, जिल्हा सदस्य रजत पवार, ज्येष्ठ सल्लागार दिनकर कांबळे, कोतवडे विभाग अध्यक्ष सिद्धार्थ आयरे, कोतवडे विभाग उपाध्यक्ष हेमंत कांबळे आणि वाटद विभाग अध्यक्ष राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय निवेंडी शाखा अध्यक्ष मीनानाथ कदम यांच्यासह निवेंडी शाखा सदस्य प्रवीण कदम, महेंद्र कदम, जयवंत कदम, प्रदीप कदम, करण कदम, राज कदम तसेच कोतवडे विभागातील कार्यकर्ते मनोज कांबळे, प्रितेश आयरे, मंगेश जाधव, अमोल आयरे, अनिल आयरे, मंगेश पवार आदी तालुका पदाधिकारी व विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस उपाध्यक्ष सुगंध कदम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.




