ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्त वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; ५ चालकांवर गुन्हे दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्त वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; ५ चालकांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्त वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; ५ चालकांवर गुन्हे दाखल

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 3:43 pm
Gramin Varta
76 Views
Share

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख महामार्ग, बाजारपेठा आणि सर्व्हिस रस्त्यांवर निष्काळजीपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सावर्डे, राजापूर आणि संगमेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी केल्याप्रकरणी तब्बल पाच चालकांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८५ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वहाळफाटा ते पालवण सर्व्हिस रोडवर अमृततुल्य हॉटेलसमोर मॅक्स गाडी (क्रमांक एम.एच. १३ एन ६५७१) उभी करून वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी रवींद्र विलास सावंत (वय ३४, रा. तोंडली सडेवाडी, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल सतिश कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सावर्डे बाजारपेठेत गुडलक हॉटेलसमोरील महामार्गावर टेम्पो (क्रमांक एम.एच. १० सी.आर. ८९८०) अस्ताव्यस्त उभा केल्याप्रकरणी रवीराज राजन शेडगे (वय ३६, रा. दापोली) याच्याविरुद्ध सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल साळवी यांनी दुसरी कारवाई नोंदवली.

राजापूर शहरात जुनेद चिकन सेंटरसमोर मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी बजाज रिक्षा (क्रमांक एम.एच. ०८ ए.क्यू. ५१६१) उभी करून वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी अरुण जानू गितये (वय ६०, रा. गीतयेवाडी, वडदहसोळ, ता. राजापूर) याच्यावर पोलीस शिपाई संग्राम नरुटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. राजापूर तालुक्यातील कोदवली येथे सचिन स्क्रॅप मर्चंटसमोरील सर्व्हिस रोडवर बोलेरो पिकअप (क्रमांक एम.एच. ०८ डब्ल्यू ३९५१) बेवारस उभी करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याबद्दल भरत वसंत शिंदे (वय ३४, रा. कोदवली पेट्रोल पंपाजवळ, राजापूर) याच्याविरुद्ध पोलीस शिपाई संभाजी कदम यांनी कारवाई केली.

संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठेत प्राथमिक आरोग्य केंद्रानजीकच्या रस्त्यावर महिंद्रा मॅक्स गाडी (क्रमांक एम.एच. ०८ सी ५०७४) उभी करून धोका निर्माण केल्याप्रकरणी राम श्रीपत किंजळकर (वय ४७, रा. मधली साळवीवाडी, खेरशेत, ता. चिपळूण) याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल वैभवकुमार चौगुले यांच्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीर व निष्काळजीपणे वाहने उभी करून अपघातांना निमंत्रण देणाऱ्यांविरोधात यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Total Visitors :

5468457
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

माध्यमिक विद्यालय वरवडे व श्रीम. पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात

Gramin Varta
2 Min Read

राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा; 16 ऑक्टोबरला मतदान

Gramin Varta
2 Min Read

बंगालच्या उपसागरातील हालचालींमुळे देशातील १३ राज्यांत पावसाची शक्यता; महाराष्ट्राला ‘ऑरेंज अलर्ट’!

Gramin Varta
2 Min Read

Revolutionizing Entertainment Key Insights into the Digital Transformation Shift

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे शीतगृहाची रत्नागिरीत होणार उभारणी

2 Min Read
रत्नागिरी

‘आपले सरकार’ पोर्टल सेवांमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दल ऑक्टोबर महिन्यात पुन्हा राज्यात अव्वल; मिशन ‘रॅपिड’च्या प्रभावी अंमलबजावणीला मोठे यश

2 Min Read
रत्नागिरी

अपघातावर जिद्दीने मात करत गुरुनाथ डोंगळे यांची स्वावलंबनाकडे वाटचाल; आर एच पी फाउंडेशनतर्फे मिळाली ‘निओमोशन’ इलेक्ट्रॉनिक गाडी

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?