लांजा (अरबाज नेवरेकर) : दारूच्या नशेत विहिरीत पडून बुडाल्याने गणेश लक्ष्मण दाभोळकर (वय ५८, रा. आसगे, मांडवकरवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२० सप्टेंबर) रात्री घडली असून, उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोमवारी पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश दाभोळकर हे रविवारी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत असताना विहिरीच्या पाण्यात पडले. त्यानंतर त्यांच्यात कोणतीही हालचाल दिसून न आल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सोमवारी पहाटे ३.३० वाजता त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये प्रकरण दाखल करण्यात आले आहे. याबाबतचा अहवाल कार्यकारी दंडाधिकारी, लांजा यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
लांजा : दारूच्या नशेत विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू
Leave a Comment





