ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माचाळमध्ये दाखल झाली लालपरी; आमदार किरण सामंतांच्या पाठपुराव्याला यश, ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माचाळमध्ये दाखल झाली लालपरी; आमदार किरण सामंतांच्या पाठपुराव्याला यश, ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत
लांजा

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माचाळमध्ये दाखल झाली लालपरी; आमदार किरण सामंतांच्या पाठपुराव्याला यश, ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत

Gramin Varta
Last updated: November 2, 2026 11:04 am
Gramin Varta
498 Views
Share

प्रभानवल्ली / सिकंदर फरास: लांजा तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस दाखल झाली असून, या ऐतिहासिक क्षणाचे स्थानिक ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फित कापून अभूतपूर्व उत्साहात स्वागत केले. आमदार किरण सामंत यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे गावकरी, वयोवृद्ध आणि विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांची वर्षानुवर्षांची पायपीट कायमची थांबली आहे.

माचाळ परिसरातील नागरिकांची वाहतुकीअभावी होणारी गैरसोय आणि विद्यार्थ्यांचे हाल लक्षात घेऊन प्रभानवल्ली पंचायत समिती सदस्य उमेश पत्की यांनी गावात एसटी बस सुरू व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळून गावात पहिल्यांदाच लालपरी पोहोचताच ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. हा मार्ग सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभाग वाहतूक शाखा, लांजा आगाराचे व्यवस्थापक प्रकाश झोरे, ललित आयरे, लांजा स्थानक प्रमुख एस. एस. माळी आणि यशवंत मयेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या सेवेसाठी प्रत्यक्ष नियोजन करणाऱ्या सहाय्यक वाहतूक निरीक्षक गणेश कुमार वायदंडे व पंचायत समिती सदस्य उमेश पत्की यांचा ग्रामस्थ आणि लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या ऐतिहासिक स्वागत सोहळ्याप्रसंगी सभापती सौ. मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. विनिता गांगण, लांजा तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उप तालुका संघटक चेतन खांदारे यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि माचाळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच गावात बस सेवा सुरू झाल्याने समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी आमदार किरण सामंत यांच्यासह एसटी प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.

Total Visitors :

5468552
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संगमेश्वर : नावडी येथील ग्रामदेवता श्री निनावी देवीचा नवरात्रोत्सव सामाजिक ऐक्याच्या वातावरणात जल्लोषात संपन्न

Gramin Varta
2 Min Read

अभियंता पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासऱ्यांना बेड्या; ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन

Gramin Varta
2 Min Read

जिंदाल कंपनीविरोधात जयगडच्या भूमिपुत्रांचे आंदोलन तीव्र; दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने शासकीय रुग्णालयात दाखल

Gramin Varta
1 Min Read

राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय होणार; पंजाबराव डख यांच्यासह हवामान विभागाचा अंदाज

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा शहरासह तालुक्यात गणरायाचे वाजतगाजत आगमन; भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाला सुरुवात

1 Min Read
लांजा

लांजा येथे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन; ३५ वर्षीय तरुणावर गुन्हा

1 Min Read
लांजा

लांजा तालुक्यात १३ हजार ५८८ बाप्पांना भावपूर्ण निरोप

1 Min Read
लांजा

लांजा येथे उद्या २१ हजार दिव्यांचा भव्य दीपोत्सव; फटाक्यांच्या आतषबाजीने रंगणार सोहळा!

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?