ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ ने उडवला धुव्वा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ ने उडवला धुव्वा
देश-विदेश

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ ने उडवला धुव्वा

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 4:39 pm
Gramin Varta
1 View
Share

दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आपली विजयी मालिका कायम राखली आहे. भारताने ‘पूल बी’ मधील दुसऱ्या सामन्यात इंडोनेशियाचा १७-१ असा दणदणीत पराभव केला.

या विजयात दीपिका सेहरावत आणि रुतुजा पिसाळ या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.

याआधी उझबेकिस्तानविरुद्धच्या १९-० अशा विजयात विक्रमी आठ गोल करणाऱ्या दीपिकाने या सामन्यातही रुतुजाच्या साथीने आणखी तीन गोल केले. तसेच, सुनीलिता टोप्पो, कर्णधार सलिमा टेटे आणि साक्षी राणा यांनीही गोल नोंदवत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

इंडोनेशियाविरुद्धच्या या सामन्यात, विक्रमी कामगिरी करणाऱ्या दीपिकाने आठव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करत संघाच्या गोल-वर्षावाची सुरुवात केली. तिने यासाठी एक उत्कृष्ट ‘ड्रॅग-फ्लिक’ लगावला. पुढील सात मिनिटांत गोलचा पाऊस पडला. सुनीलिता टोप्पो (११ वे मिनिट), लालरेम्सियामी (१३ व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे गोल) आणि रुतुजा पिसाळ (१५ वे मिनिट) यांनी गोल करत पहिल्या सत्राच्या अखेरीस संघाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. लालरेम्सियामीचा गोल नवनीतच्या पेनल्टी कॉर्नरवरील फटक्यानंतर आला. नवनीतचा फटका गोलकीपरने अडवला होता. पण ‘रिबाउंड’वर लालरेम्सियामीने गोल करण्यात यश मिळवले.

रुतुजाचा पहिला गोलही ‘रिबाउंड’वर जवळून करण्यात आला होता. दीपिकाचा फटका गोलकीपरने अडवल्यानंतर तिला ही संधी मिळाली होती.

दुसऱ्या सत्राची सुरुवात लालरेम्सियामीने धमाकेदार पद्धतीने केली. गोलकीपरने अडवलेला एक लांब आणि जमिनीलगतचा पास भारतीय फॉरवर्ड खेळाडूंनी ताब्यात घेतला आणि चेंडू मिळताच तिने ‘रिव्हर्स हिट’ मारून १६ व्या मिनिटाला आपला दिवसातील दुसरा गोल नोंदवला.

रुतुजाने २० व्या मिनिटाला आपला दुसरा गोल केला. नेहा चेंडू घेऊन ‘सर्कल’मध्ये आली आणि तिने रुतुजाला पास दिलारु. तुजाने कोणतीही चूक न करता फटका मारला आणि भारताची आघाडी ६-० ने वाढवली. गोलचा हा सिलसिला पुढेही चालू राहिला. साक्षी राणाने २५ व्या मिनिटाला गोल नोंदवला, तर दीपिका (२८ वे मिनिट) आणि सुनीलिता (३० वे मिनिट) यांनी पेनल्टी कॉर्नरचे यशस्वीरीत्या गोलमध्ये रूपांतर केले. मध्यंतरापर्यंत भारताने इंडोनेशियावर पूर्ण वर्चस्व गाजवत ९-० अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरापर्यंत, भारताकडे ५५ टक्के चेंडूवरील ताबा होता आणि त्यांना नऊ पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते, तर इंडोनेशियाला केवळ दोनच मिळाले होते.

मध्यंतरानंतर, कर्णधार सलिमा टेटे (३४ व्या मिनिटाला), नवनीत (३५ व्या मिनिटाला), इशिका (३६ व्या मिनिटाला), ऋतुजा (३९ व्या मिनिटाला) आणि दीपिका (४० व्या मिनिटाला) यांनी आक्रमक खेळ सुरूच ठेवला आणि गोलचा फरक १४-१ असा केला. दरम्यान, इंडोनेशियाच्या इनिस आदियिताने ३२ व्या मिनिटाला एक गोल केला होता.त्यानंतर नवनीत (५६ व्या आणि ५७ व्या मिनिटाला) आणि साक्षी राणा (५७ व्या मिनिटाला) यांनी भारतासाठी आणखी गोल केले.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Navigating the Cosmos to Uncover the Mysteries of the Universe

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मोलाची: डॉ. विकास पाटील

Gramin Varta
2 Min Read

जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी ‘चलो दिल्ली’; १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन

Gramin Varta
4 Min Read

रत्नागिरी: बोटीवर स्वयंपाक करताना गॅसचा भडका; गंभीर भाजलेल्या खलाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

नेपाळच्या पूरग्रस्तांसाठी अमेरिकेची ३१ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर ; पूल, निवारा आणि ड्रोनसाठी निधी

2 Min Read
देश-विदेश

आकाशाला गवसणी घालणारे अतुलनीय शौर्य; भारतीय लष्कराच्या जांबाज श्वानाची पॅराशूटसह ऐतिहासिक झेप

2 Min Read
देश-विदेश

एसआयआर प्रकरणी स्पष्टीकरण; सर्व निर्णय एकमताने घेतले- निवडणूक आयोग

4 Min Read
देश-विदेश

हिऱ्यात साक्षात विघ्नहर्त्याचे रूप; सुरतमधील ६१८.२७ कॅरेटचा अद्भूत रफ डायमंड दर्शनासाठी खुला, मूल्य कोट्यवधींच्या घरात

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?