ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा उत्साहात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा उत्साहात
संगमेश्वर

संगमेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा उत्साहात

Gramin Varta
Last updated: September 3, 2026 7:29 am
Gramin Varta
4 Views
Share

शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा; संघटनात्मक एकजुटीचा निर्धार

संगमेश्वर: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शाखा संगमेश्वर यांच्या वतीने तालुका कार्यकारिणीची सहविचार सभा दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा आरवली नंबर 1 येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला तालुक्यातील सुमारे 75 ते 80 शिक्षक बंधू-भगिनींची उपस्थिती लाभली.सभेत शिक्षकांच्या विविध सेवाविषयक व प्रशासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेची भूमिका, कार्यपद्धती आणि आगामी काळातील संघटनात्मक कार्य याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

या सभेला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप देवळेकर, जिल्हा सचिव श्री. भालचंद्र घुले, चिपळूण तालुकाध्यक्ष तथा तज्ञ संचालक शिक्षक पतपेढी, दापोली तालुकाध्यक्ष श्री. विजय फंड तसेच श्री. संजय घाग यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. विजय फंड यांनी संघटनेची भूमिका, कार्यपद्धती आणि संघटनात्मक एकजुटीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप देवळेकर यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करताना शिक्षकांच्या न्याय्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील, असे सांगितले.

सभेत उपस्थित शिक्षकांनी आपल्या विविध अडचणी, सूचना व अपेक्षा मांडल्या. तालुक्यातील कोणत्याही शिक्षकाला सेवाविषयक, प्रशासकीय अथवा अन्य अडचण निर्माण झाल्यास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.सभेचे नियोजन व आयोजन तालुकाध्यक्ष श्री. प्रवीण प्रकाश सावंत, सरचिटणीस श्री. आनंद देशपांडे, कार्याध्यक्ष श्री. संतोष जाधव, श्री. आदम सय्यद, उपाध्यक्ष श्री. आबा सरगर, श्री. अरविंद पवार, श्री.अशोक जायभाये तसेच तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी संघटितपणे व सकारात्मक भूमिकेतून कार्य करावे, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुका शाखांनी परस्पर सहकार्याने शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

“आपली समस्या ही संघटनेची जबाबदारी असून, शिक्षकांची एकजूट हीच संघटनेची खरी ताकद आहे,” या भावनेतून आगामी काळात संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प सभेत करण्यात आला.

Total Visitors :

5427529
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरुख: आंबव हनुमान स्टॉपजवळ गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

लांजा तालुक्यात १३ हजार ५८८ बाप्पांना भावपूर्ण निरोप

Gramin Varta
1 Min Read

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

Gramin Varta
2 Min Read

Escapades and Outdoor Exploration in Spectacular Travel Hotspots

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

चिमुकल्या मोदकांवर अवतरले साक्षात अष्टविनायक; विलास राहटे यांचा सूक्ष्म कलाविष्कार गणेशभक्तांच्या पसंतीस

2 Min Read
संगमेश्वर

तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वरच्या चार एक्सप्रेससाठी ‘उंदीरमामा’ मैदानात!

1 Min Read
संगमेश्वर

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची देशभरात ‘महामोहीम’; संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावाची विशेष निवड

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?