ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: भारताचा जपानवर ८ विकेट्सनी दणदणीत विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » भारताचा जपानवर ८ विकेट्सनी दणदणीत विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश
देश-विदेश

भारताचा जपानवर ८ विकेट्सनी दणदणीत विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 8:24 am
Gramin Varta
26 Views
Share

दिल्ली: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करत एशियन गेम्स-२०२६ची विजयी सुरुवात केली. नुकताच आशिया कप जिंकून आलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी जपानचा एकतर्फी सामन्यात ८ विकेट्सनी पराभव केला.

या विजयासह भारताने उपांत्य फेरीतही प्रवेश केला आहे. भारतीय संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीतून खेळण्याची संधी मिळाली होती.

भारताने नाणेफेक जिंकून जपानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जपानने सावध आणि संथ सुरुवात केली. मात्र, पॉवरप्लेमध्ये त्यांनी एकही विकेट गमावली नाही. त्यामुळे जपानचा संघ चांगली धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. मात्र, सातव्या षटकापासून जपानच्या विकेट्स झपाट्याने पडू लागल्या. अखेर २०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जपानचा शेवटचा फलंदाज बाद झाला आणि संपूर्ण संघ अवघ्या ५७ धावांवर गारद झाला.

भारताने हे ५८ धावांचे सोपे लक्ष्य अवघ्या पाच षटकांत दोन विकेट्स गमावून गाठले. भारताला पहिली विकेट श्रीचरणीने मिळवून दिली. सातव्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन विकेट्स घेत तिने जपानच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्यानंतर जपानच्या विकेट्स सातत्याने पडत गेल्या.जपानच्या केवळ दोन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. त्यापैकी अयाका काटो स्टॅफर्डने सर्वाधिक २५ धावा केल्या. तिची सलामीची साथीदार हारुना इवासाकीला १० धावा करता आल्या.

भारताकडून श्रीचरणीने चार षटकांत अवघ्या १० धावा देत दोन षटके निर्धाव टाकली आणि चार विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय शेफाली वर्माने दोन विकेट्स घेतल्या. श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्माच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट आली. तर जपानच्या दोन फलंदाज धावबाद झाल्या.लक्ष्य अत्यंत सोपे असल्याने भारत सहज विजय मिळवेल, याची जपानलाही कल्पना होती. मात्र, जपानच्या गोलंदाजांनी भारताच्या दोन विकेट्स मिळवत काही काळ भारतीय संघाला धक्का दिला. या दोन विकेट्स घेतल्यानंतर जपानच्या संपूर्ण संघाचा आनंद गगनात मावत नव्हता.

स्मृती मंधानाच्या जागी शेफाली वर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेली गुणालन कामिलिनी दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर खाते न उघडताच बाद झाली. त्यानंतर भारती फुलमाळीही तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर तंबूत परतली. तिने ६ धावा केल्या.दुसऱ्या बाजूला उभी असलेली शेफाली वर्मा मात्र आक्रमक अंदाजात फलंदाजी करत राहिली. तिने अवघ्या १५ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या. त्यानंतर ऋचा घोषने षटकार ठोकत भारताचा विजय निश्चित केला. ऋचा ६ चेंडूंमध्ये २ षटकारांच्या मदतीने १२ धावा करून नाबाद राहिली.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

Gramin Varta
1 Min Read

लांजा: उड्डाणपुलावर भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू; चालक घटनास्थळावरून पसार

Gramin Varta
2 Min Read

हप्ता थकला तरी बळजबरीने वाहन जप्ती करता येणार नाही; फायनान्स कंपनीला १० लाखांच्या दंडासह वसुली नियमांवर कडक ताशेरे

Gramin Varta
3 Min Read

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

“शिवसेनेसारखा वाद लांबवू नका!” तृणमूलच्या नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्ट कडक; निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत ‘टाइमलाइन’ देण्याचे आदेश

3 Min Read
देश-विदेश

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: भारतीय महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा १७-१ ने उडवला धुव्वा

3 Min Read
देश-विदेश

केंद्रीय कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना सप्टेंबरचा पगार आजच; बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

1 Min Read
देश-विदेश

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, १३ खलाशी बचावले, एक बेपत्ता; भारताकडून निषेध

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?