ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीसाठी महाराष्ट्रासह देशभरात जोरदार निदर्शने
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीसाठी महाराष्ट्रासह देशभरात जोरदार निदर्शने
देश-विदेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीसाठी महाराष्ट्रासह देशभरात जोरदार निदर्शने

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:42 am
Gramin Varta
7 Views
Share

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये सोमवारी निदर्शने करण्यात येत आहेत. यामध्ये दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड आणि उत्तराखंड आदी राज्यांतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी होत निदर्शने केली.

महाराष्ट्रातही धुळे, कोल्हापूर, अमरावती, परभणी, लातूरसह अनेक जिल्ह्यांत काॅंग्रेसकडून जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी तथा स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल आणि पक्षाच्या भविष्यातील रणनीतीवर विचार केला जाईल. पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेस हा मुद्दा गांभीर्याने हाताळेल आणि काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सर्व सदस्य आपल्या सूचना सादर करतील. हा मुद्दा केवळ एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नाही, तर तो देशाच्या लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाशी संबंधित आहे. ते म्हणाले की, काँग्रेस हा मुद्दा गांभीर्याने घेत असून काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत भविष्यातील रणनीती तयार केली जाईल.

निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काँग्रेस अध्यक्षांनी आरोप केला की, पक्षाच्याच सदस्यांनी त्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी केरळचे माजी मुख्य सचिव जी. जी. थॉमसन यांच्या दाव्याचा हवाला दिला, ज्यांनी म्हटले होते की २०१६ मध्ये, तत्कालीन आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी त्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवण्याचा सल्ला दिला होता. थॉमसन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हा सल्ला स्वीकारला नाही.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या घरावर काळी शाई फासली आणि लिहिले – ‘ज्ञानेश कुमार गद्दार, मत चोर’. राजस्थानच्या जयपूरमध्ये शहीद स्मारक येथे सभा झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखले. पोलिसांनी माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्यासह कार्यकर्त्यांवर वॉटर कॅननचा वापर केला.

मध्य प्रदेशात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) विरोधात भोपाळमध्ये काँग्रेसचे आंदोलन करण्यात आले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यासाठी पोहोचले आहेत. यादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. काही कार्यकर्ते बॅरिकेड्सवरही चढले.

हरियाणा आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांत काँग्रेसकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोन्ही राज्यांत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घातला. याच पार्श्वभूमीवर दुर्गमध्ये काँग्रेसने काळे कपडे परिधान करून रॅली काढली.

उत्तराखंडमधील 8 जिल्ह्यांत मतचोरी विरोधात काँग्रेसने आंदोलन केले. डेहराडून, नैनीताल, हल्द्वानी, टिहरी, बागेश्वर, रुडकी, रुद्रपूर, उत्तरकाशी आणि पिथौरागढ येथे काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून जोरदार विरोध दर्शवला.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुष्काळाच्या यादीतून लांजा तालुका वगळल्याने शेतकरी आक्रमक; निर्णयाच्या फेरविचाराची मागणी

Gramin Varta
2 Min Read

गणेशोत्सवात साकारली ‘श्री समर्थ बैठक’; वनगुळे-सुतारवाडीतील पंकज पांचाळ यांच्या कलाकृतीने वेधले लक्ष

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण : कापसाळ येथे आयशर-कंटेनरचा भीषण अपघात; चालक जखमी

Gramin Varta
2 Min Read

हातखंबा पोलीस मदत केंद्रात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा; पोलीस अंमलदार नितीन जाधवर यांचा कौतुकास्पद पुढाकार

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

आकाशाला गवसणी घालणारे अतुलनीय शौर्य; भारतीय लष्कराच्या जांबाज श्वानाची पॅराशूटसह ऐतिहासिक झेप

2 Min Read
देश-विदेश

दिवाळीत देशभरात आतापर्यंत ६ लाख कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल : कॅटचा अंदाज

6 Min Read
देश-विदेश

मतदार यादीतील घोळाविरोधात आज राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयावर धडकणार

2 Min Read
देश-विदेश

गुजरात : भारत-पाकिस्तान सीमेजवळ 4 पाकिस्तानी मासेमारांना अटक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?