ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ उत्साहात संपन्न; समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ उत्साहात संपन्न; समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
दापोली

हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ उत्साहात संपन्न; समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 8:59 am
Gramin Varta
24 Views
Share

दापोली : “स्वच्छ भारत, विकसित भारत” आणि “आपला समुद्र आपली जबाबदारी” हा मूलमंत्र प्रत्यक्ष कृतीत उतरवत हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. ग्रामपंचायत हर्णै, सेवा चॅरिटेबल ट्रस्ट हर्णै (SEVA Charitable TRUST Harnai) आणि जेएनके मरीन ॲक्वा लाइफ (JNK Marine Aqua Life Harnai) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत नागरिक, विविध शाळांचे विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने एकत्र येत अखंड श्रमदान केले.

सायंकाळी ४ ते ५ या वेळेत राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेदरम्यान संपूर्ण बंदर परिसराची सखोल स्वच्छता करून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व इतर कचरा संकलित करण्यात आला. केवळ कचरा उचलण्यापुरते मर्यादित न राहता नदी, खाडी आणि समुद्र प्रदूषणाचे जलचरांवर होणारे घातक परिणाम रोखणे तसेच स्थानिक सागरी जैवविविधतेचे रक्षण करणे, याबाबत उपस्थितांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. “चला, एकत्र येऊया; हर्णै स्वच्छ करूया!” अशी साद घालत पर्यावरण संरक्षणासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या अभियानाला जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या धाडवे, गटविकास अधिकारी मंडलिक, सहाय्यक गटविकास अधिकारी मर्चंडे, विस्तार अधिकारी खांडके व भुसारे, हर्णै ग्रामपंचायत प्रशासक मोहिते व कर्मचारी वर्ग, माजी सरपंच महेश पवार, हर्णैचे तलाठी अक्षय पाटील, वनरक्षक प्रभू साबणे, सर्पमित्र सुरेश खानविलकर व किरण करमरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पर्यावरण जनजागृतीसाठी ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत परांजपे, निवेदिता प्रतिष्ठानच्या सदस्या वैष्णवी मराठे वैद्य, गायत्री अय्यर, श्री. अय्यर आणि अविनाश खुळे (दापोली) यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. याशिवाय एन. डी. गोळे हायस्कूल व नॅशनल हायस्कूल हर्णैचे शिक्षक व विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि हर्णै ज्येष्ठ नागरिक वर्गाने दाखवलेला उत्स्फूर्त उत्साह या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला. समुद्र आणि खाडी परिसर स्वच्छ राखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन दिलेला हा पर्यावरणपूरक लढा संपूर्ण किनारपट्टी भागात कौतुकाचा विषय ठरला असून, आयोजकांनी सर्व सहभागी घटकांचे शेवटी आभार मानले.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाखांची लाच घेताना रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक रंगेहात जाळ्यात

Gramin Varta
2 Min Read

आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय आयोजित कोकण विभागीय सहसंवेदना कार्यशाळा संपन्न

Gramin Varta
3 Min Read

संगमेश्वर परिसरात गौरी-गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जन; चाकरमान्यांच्या उपस्थितीने कोकण फुलले

Gramin Varta
2 Min Read

Stories of Progress and Potential in Startup Realities

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोलीत काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न

2 Min Read
दापोली

दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

2 Min Read
दापोली

दापोली चॅम्पियन लीगच्या पहिल्या हंगामावर ‘आय के स्पोर्ट्स’चा कब्जा; ‘बीटीएफ स्टुडिओ’चा ३-० ने पराभव

2 Min Read
दापोली

हर्णे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळले खवले मांजर

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?