ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दापोली येथील श्री गोपाळकृष्ण पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाला कोल्हापूर सर्किट बेंचकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दापोली येथील श्री गोपाळकृष्ण पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाला कोल्हापूर सर्किट बेंचकडून अटकपूर्व जामीन मंजूर
दापोली

दापोली येथील श्री गोपाळकृष्ण पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाला कोल्हापूर सर्किट बेंचकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Gramin Varta
Last updated: October 8, 2026 9:52 am
Gramin Varta
42 Views
Share

दापोली : दापोली येथील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील बहुचर्चित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दाखल गुन्ह्यातील संचालक मंडळातील पदाधिकारी आणि संचालकांना कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील व्यवस्थापक बी. आर. मोरे यांना मात्र कोणताही दिलासा मिळालेला नसून त्यांचा जामीन अर्ज मंजूर झालेला नाही. २०१८-१९ ते २०२२-२३ या आर्थिक कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप करणे आणि संस्थेच्या ठेवींचा गैरवापर करून सुमारे २ कोटी ६९ लाख ५० हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने युक्तिवाद करताना संचालकांवरील कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले. संचालक मंडळाने कोणताही आर्थिक गुन्हा केला नसून उलट कर्जदारांनीच बनावट कागदपत्रे सादर करून संस्थेची फसवणूक केल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. अशा फसव्या कर्जदारांविरोधात संचालक मंडळाने यापूर्वीच पोलीस ठाण्यात तसेच दिवाणी न्यायालयात रीतसर कायदेशीर दावे दाखल केल्याचे पुराव्यांसह स्पष्ट करण्यात आले. सरकारी ऑडिटरच्या अहवालातही संचालकांवर थेट भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप सिद्ध होत नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने संचालकांना हा कायदेशीर दिलासा दिला आहे.

Total Visitors :

5468443
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर करंजारी येथे भीषण अपघात; कारच्या धडकेत बाईकस्वार गंभीर जखमी

Gramin Varta
1 Min Read

उत्तर युरोपातून कोकण किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन; दापोलीच्या हर्णे-पाळंदे समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे पहिले दर्शन

Gramin Varta
2 Min Read

भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा उत्स्फूर्त सहभाग

Gramin Varta
1 Min Read

राष्ट्रवादीच्या सहा बड्या नेत्यांची घेतली अमित शाहांची भेट

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोली तालुक्यातील टाळसुरेत भरदिवसा घरफोडी; कपाटातील पावणेचार लाखांचे दागिने लंपास

2 Min Read
दापोली

सलग सुट्ट्यांनी दापोलीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा गजबजला; रिसॉर्ट्स हाऊसफुल्ल, हर्णै बंदरात पर्यटकांसह खवय्यांची मासे खरेदीसाठी झुंबड

3 Min Read
दापोली

दापोली : मुंबईला जातो सांगून घरातून निघालेल्या मुरुड येथील तरुणाचा तलावात आढळला मृतदेह

1 Min Read
दापोली

दापोली तालुक्यातील तीन प्रस्तावित प्रकल्पांविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?