ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: उत्तर युरोपातून कोकण किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन; दापोलीच्या हर्णे-पाळंदे समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे पहिले दर्शन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » उत्तर युरोपातून कोकण किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन; दापोलीच्या हर्णे-पाळंदे समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे पहिले दर्शन
दापोली

उत्तर युरोपातून कोकण किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन; दापोलीच्या हर्णे-पाळंदे समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे पहिले दर्शन

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 8:28 am
Gramin Varta
29 Views
Share

संशोधक फहाद जमादार यांनी केली हिवाळी हंगामाची नोंद; पर्यटकांसह पक्षी अभ्यासकांचे लक्ष

दापोली: हिवाळ्याची चाहूल लागताच कोकण किनारपट्टीवर दरवर्षी दाखल होणाऱ्या परदेशी स्थलांतरित पाहुण्यांचे आगमन यंदाही वेळेवर सुरू झाले असून, दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णे-पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर १ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सीगल’ (Seagull) पक्ष्यांचे यंदाच्या मोसमातील पहिले दर्शन घडले आहे. हजारो मैलांचा प्रवास करून उत्तर युरोप आणि सायबेरियासारख्या अतिथंड प्रदेशातून अन्नाच्या शोधात व अनुकूल हवामानासाठी भारतात येणाऱ्या या हिवाळी पाहुण्यांच्या आगमनाने दापोलीची विस्तीर्ण किनारपट्टी आता पुन्हा एकदा निसर्गसौंदर्याने बहरू लागली आहे.

समुद्री जीव व अधिवास संवर्धन संशोधक फहाद जमादार हे किनारपट्टीवर नियमित गस्त घालत असताना आणि समुद्री जैवविविधतेचे निरीक्षण करत असताना त्यांना हर्णे-पाळंदे किनाऱ्यावर हे सीगल पक्षी मुक्त संचार करताना आढळून आले. त्यांनी या हंगामातील पहिल्या आगमनाची शास्त्रीय नोंद अधिकृतपणे केली असून, यामुळे यंदाच्या स्थलांतरित पक्षी हंगामाची प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोलीतील दाभोळ, कोळथरे, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णे, आंजर्ले, आडे, पाडले आणि केळशी या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी हे पक्षी मोठ्या संख्येने डेरेदाखल होत असतात.

हर्णे-पाळंदे परिसरातील समुद्रकिनारा हा स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांसह समृद्ध सागरी जीवसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा अधिवास मानला जातो. हिवाळ्यात येथे दाखल होणारे हे पक्षी केवळ पर्यटकांचे आकर्षण ठरत नाहीत, तर ते सागरी परिसंस्थेचा अविभाज्य घटक असून त्यांच्या उपस्थितीवरून किनारपट्टीच्या आरोग्यदायी वातावरणाचा अंदाज लावला जातो. अशा स्थलांतरित पक्ष्यांचे नियमित निरीक्षण, नोंदणी, छायाचित्रण आणि त्यांच्या अधिवासाचे संवर्धन भविष्यातील अभ्यासासाठी मोलाचे ठरणार आहे. सीगलच्या आगमनानंतर आता आगामी काळात आणखी कोणकोणते दुर्मीळ परदेशी पक्षी या किनारपट्टीवर दाखल होतात, याकडे समस्त पक्षीप्रेमी आणि सागरी जैवविविधता अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कोकण रेल्वे मार्गाचे येत्या ५ वर्षांत दुपदरीकरण पूर्ण करणार; दररोज धावणार १०० हून अधिक गाड्या

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या

Gramin Varta
2 Min Read

दुष्काळाच्या यादीतून लांजा तालुका वगळल्याने शेतकरी आक्रमक; निर्णयाच्या फेरविचाराची मागणी

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोली : मुगीज कलमपेठ येथे बंद घर फोडून आठ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

2 Min Read

Hello world!

0 Min Read
दापोली

दापोली चॅम्पियन लीगच्या पहिल्या हंगामावर ‘आय के स्पोर्ट्स’चा कब्जा; ‘बीटीएफ स्टुडिओ’चा ३-० ने पराभव

2 Min Read
दापोली

ब्रेकिंग : दाभोळजवळ शिकारीदरम्यान गावठी बंदुकीतून मिसफायर; एकाचा जागीच मृत्यू, तर दुसरा जखमी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?