दापोली : महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख व अधिकारी महासंघाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा व दापोली तालुका कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. महासंघाचे राज्याध्यक्ष आदरणीय श्री. राजेंद्र खैरनार सर यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरावरून तसेच जिल्हास्तरावरून या निवडी करण्यात आल्या.
दापोली तालुका अध्यक्षपदी श्री. अमोल मोरे सर यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात महासंघाचे संघटन अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीमध्ये जिल्हा कार्याध्यक्षपदी श्री. उजेर शेख सर, तर कायदेविषयक सल्लागारपदी श्री. प्रमोद गुंजाळ सर यांची निवड झाली आहे.
दापोली तालुका कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी श्री. गोरख वागसकर सर , सचिवपदी श्री. सुरज गायकर सर, कार्याध्यक्षपदी श्री. विकास पटले सर , कोषाध्यक्षपदी श्री. विनेश साळवी सर, प्रसिद्धी प्रमुखपदी श्री. नकुल कड सर आणि मुख्य संघटकपदी श्री. केशव नागरगोजे सर यांची निवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रप्रमुख व अधिकाऱ्यांचे प्रश्न, प्रशासकीय अडचणी आणि सेवाविषयक विषय प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास व्यक्त होत असून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.






