ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर : काटवली पड्याळवाडी येथे मोबाईलच्या कारणावरून १२ वर्षीय बालिकेची विष प्राशन करून आत्महत्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर : काटवली पड्याळवाडी येथे मोबाईलच्या कारणावरून १२ वर्षीय बालिकेची विष प्राशन करून आत्महत्या
संगमेश्वर

संगमेश्वर : काटवली पड्याळवाडी येथे मोबाईलच्या कारणावरून १२ वर्षीय बालिकेची विष प्राशन करून आत्महत्या

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 7:42 am
Gramin Varta
97 Views
Share

संगमेश्वर ( प्रतिनिधी): मोबाईल फोनच्या वापरावरून कुटुंबीयांनी विचारणा केल्याच्या कारणावरून काटवली पड्याळवाडी येथे आजोळी राहणाऱ्या एका अवघ्या १२ वर्षीय बालिकेने विषारी पावडर प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अनंत चतुर्दशीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण पंचक्रोशीत तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर चिमुरडी आपल्या आजीचा मोबाईल फोन शाळेत घेऊन गेली होती. यासंदर्भात कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारणा करत तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या विचारणेचा राग मनात धरून अनंत चतुर्दशीच्या गणरायाच्या आरतीच्या सुमारास, रात्री साधारण साडे नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान तिने विषारी पावडर प्राशन केली. उपचारादरम्यान तिचा करुण अंत झाला. उमलत्या वयातील या बालिकेच्या जाण्याने आई-वडील, आजी, मामा आणि मामी यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

या अविचारी आणि टोकाच्या पावलामुळे तिचे कुटुंबीय, शाळेतील मित्र-मैत्रिणी तसेच स्थानिक नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. आधुनिक युगात मोबाईल फोन ही दैनंदिन गरज बनली असली तरी बालकांच्या हातातील त्याचा अनिर्बंध वापर आणि त्यातून त्यांच्या मानसिकतेवर होणारे विपरीत परिणाम ही आज प्रत्येक कुटुंबाची गंभीर समस्या बनली आहे. पालकांनी साधे समजावून सांगितले तरीही अशा टोकाच्या प्रतिक्रिया का उमटत आहेत, यावर आत्मपरीक्षण करण्याची आणि बालकांच्या समुपदेशनाची तीव्र गरज निर्माण झाल्याचे या काळ्याकुट्ट घटनेने अधोरेखित केले आहे.

Total Visitors :

5427452
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

आकाशाला गवसणी घालणारे अतुलनीय शौर्य; भारतीय लष्कराच्या जांबाज श्वानाची पॅराशूटसह ऐतिहासिक झेप

Gramin Varta
2 Min Read

पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात; नवे दर लागू

Gramin Varta
1 Min Read

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३ वे देहदान; ‘सेवा संकल्प अभियाना’तील पहिलेच दान

Gramin Varta
2 Min Read

आधीच्या कर्जातून मुक्ती; नव्या कर्जासाठी मात्र अडसर

saurabhsalvi262@gmail.com
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

1 Min Read
संगमेश्वर

Traversing the Wonders of Earth’s Diverse and Complex Ecosystems

7 Min Read
संगमेश्वर

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची देशभरात ‘महामोहीम’; संगमेश्वर तालुक्यातील बामणोली गावाची विशेष निवड

2 Min Read
संगमेश्वर

देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रातील अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?