ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी शासकीय रुग्णालयात ACL लिगामेंटची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया; खासगी रुग्णालयातील लाखोंचा खर्च वाचला
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी शासकीय रुग्णालयात ACL लिगामेंटची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया; खासगी रुग्णालयातील लाखोंचा खर्च वाचला
रत्नागिरी

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात ACL लिगामेंटची दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया; खासगी रुग्णालयातील लाखोंचा खर्च वाचला

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 12:53 pm
Gramin Varta
365 Views
Share

रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथे अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून, गुडघ्यातील तुटलेल्या एसीएल (Anterior Cruciate Ligament) लिगामेंटची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येत असताना शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया रुग्णासाठी मोफत करण्यात आल्याने सर्वसामान्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

कराड येथील रहिवासी पांडुरंग सोपान काशीद (३८) यांना सुमारे दोन महिन्यांपूर्वी पायाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमध्ये त्यांच्या उजव्या गुडघ्यातील एसीएल लिगामेंट तुटले होते. त्यामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. चालताना गुडघा लचकणे, तसेच पायऱ्या चढताना आणि उतरताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. सुरुवातीला त्यांनी बाहेरील ठिकाणी उपचार घेतले; मात्र अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांनी रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थिरोग विभागाशी संपर्क साधला.

अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल देवकर यांनी रुग्णाची तपासणी करून दुर्बिणीद्वारे एसीएल लिगामेंट पुनर्रचना शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी रुग्णावर आर्थ्रोस्कोपिक एसीएल लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान गुडघ्यातील तुटलेल्या लिगामेंटच्या जागी नवीन लिगामेंटची पुनर्रचना करण्यात आली. गुंतागुंतीची मानली जाणारी ही शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वीरीत्या पार पडल्याने रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे.

खासगी रुग्णालयात मोठ्या खर्चाची आवश्यकता असलेल्या या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात कोणताही खर्च न झाल्याने पांडुरंग काशीद यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल देवकर, डॉ. हर्षल, भूलतज्ज्ञ डॉ. जमशेर व डॉ. ऐश्वर्या, परिचारक सिद्धेश पालकर तसेच शस्त्रक्रियेसाठी सहकार्य करणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले. शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात असल्याने रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे कौतुक होत आहे.

Total Visitors :

5435593
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नवरात्रोत्सवासह आगामी सण साधेपणाने साजरे करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Gramin Varta
2 Min Read

Unveiling the Current Shifts Reshaping the Global Technosphere

saurabhsalvi262@gmail.com
10 Min Read

दाभोळ एसटी स्थानकाजवळ संशयास्पदरीत्या वावरणारा तरुण ताब्यात

Gramin Varta
1 Min Read

चिपळूण : खेर्डी एमआयडीसीतील फर्निचर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत मांडवी भुते नाक्यावर रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव ॲक्टिव्हाची धडक; दुचाकीस्वार पसार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारीचा धुमाकूळ; पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे

2 Min Read
रत्नागिरी

मालगुंड ग्रामपंचायतीत जयगड पोलिसांचा सायबर जनजागृती उपक्रम; ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत नागरिकांशी थेट संवाद

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी एसटीच्या ताफ्यात १५० नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार; खिळखिळ्या गाड्यांच्या जागी अत्याधुनिक जिजाऊ बसेस धावणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?