ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा उत्स्फूर्त सहभाग
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा उत्स्फूर्त सहभाग
रत्नागिरी

भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा उत्स्फूर्त सहभाग

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 3:13 pm
Gramin Varta
65 Views
Share

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त इंडियन कोस्ट गार्ड, रत्नागिरीच्या वतीने भाट्ये समुद्रकिनारी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव यांच्यासह विविध संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७.१५ ते ९.१५ या वेळेत झरी विनायक मंदिर, भाट्ये परिसरातील किनारपट्टीवर हे अभियान राबविण्यात आले.

या स्वच्छता मोहिमेत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, सागरी सीमा मंच, रत्नागिरी आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव येथील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत किनाऱ्यावर विखुरलेला प्लास्टिक कचरा, बाटल्या, पिशव्या तसेच इतर घनकचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. या उपक्रमातून किनारपट्टी स्वच्छतेसोबतच सागरी पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

समुद्रकिनाऱ्यावर साचणारा प्लास्टिक व अन्य घनकचरा सागरी जीवसृष्टीसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे समुद्र, किनारपट्टी आणि सागरी परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनाचे प्राचार्य तथा सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. किनारपट्टी स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश या अभियानातून देण्यात आला.

Total Visitors :

5427562
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा

Gramin Varta
2 Min Read

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी ४८ तासांचा इशारा; एसआयआर मुद्यावरून ‘कॉक्रोच जनता पक्ष’ आक्रमक

Gramin Varta
2 Min Read

दिव्यांगत्वावर मात करत गरुडाच्या वेशात गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फा झाडी; ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’ म्हणण्याची वेळ

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : नाचणे येथे बोटीवर विराजमान गणराया; ‘समुद्र सफर’ देखाव्याने वेधले भक्तांचे लक्ष

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक

2 Min Read
रत्नागिरी

करबुडे येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?