ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा
राजापूर

उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 6:46 pm
Gramin Varta
48 Views
Share

राजापूर/तुषार पाचलकर : दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक बांबू दिनानिमित्त कोकणातील शेतकऱ्यांसाठी बांबू शेतीतून आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जलद वाढ, विविधांगी उपयोग, तुलनेने कमी देखभाल आणि वाढती बाजारपेठ यामुळे बांबू शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असून, राजापूर व लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना या शेतीची आधुनिक पद्धत आणि बाजारपेठेची माहिती देण्यासाठी समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या अध्यक्षा राजश्री (उल्का) विश्वासराव यांच्या पुढाकारातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कोकणातील लाल मातीमध्ये अभिनव कृषी उपक्रम राबवत प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या राजश्री विश्वासराव यांनी बांबू शेतीला रोजगार व उत्पन्नाचे प्रभावी साधन म्हणून पुढे आणण्याचा संकल्प केला आहे. त्याच अनुषंगाने राजापूर आणि लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना चंद्रपूर येथे बांबू शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बांबू लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रक्रिया उद्योग आणि व्यावसायिक दृष्टिकोन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले.

बांबूचा केवळ शेतीतील एक पीक म्हणून विचार न करता त्यापासून विविध उपयोगी वस्तू तयार करून मूल्यवर्धन करण्याची संधीही शेतकऱ्यांसमोर आहे. बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांना उत्पादनापासून विक्रीपर्यंतची संपूर्ण साखळी उभी करण्याच्या दिशेने समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनी काम करीत आहे.

जागतिक बांबू दिनाचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील पाचल येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यालयात बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीचा शुभारंभ तसेच प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनातून बांबूच्या विविध उपयोगांची माहिती नागरिकांना आणि शेतकऱ्यांना देण्यात आली. बांबू शेतीला बाजारपेठेशी जोडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमाला समर्जुना फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा राजश्री विश्वासराव, तुषार विश्वासराव, अनंत कोलते, विलास नारकर यांच्यासह बांबू लागवड करणारे बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कोकणातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत बांबू शेतीकडेही दीर्घकालीन उत्पन्नाचा पर्याय म्हणून पाहावे, यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण

Gramin Varta
2 Min Read

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास हायकोर्टाची मनाई

Gramin Varta
2 Min Read

महिला शेतकऱ्यांना अधिकृत सन्मान; राज्यभरात प्रमाणपत्र नोंदणी व वितरणाची धडक मोहीम सुरू, १७ ऑक्टोबरपर्यंत संधी

Gramin Varta
2 Min Read

हवामान बदल आणि वाढत्या खर्चाने मच्छीमार संकटात; उत्पादनात वाढ होऊनही आर्थिक कोंडी कायम, ‘मत्स्य दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

The Must-Have Application of the Year Charts with Innovation

7 Min Read
राजापूर

रत्नागिरी पोलिसांच्या ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत खरवते येथे सायबर गुन्हेगारी व सुरक्षिततेबाबत जनजागृती

1 Min Read
राजापूर

साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

2 Min Read
राजापूर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मोलाची: डॉ. विकास पाटील

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?