ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मालगुंड येथे आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मालगुंड येथे आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
रत्नागिरी

मालगुंड येथे आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन

Gramin Varta
Last updated: October 9, 2026 5:03 pm
Gramin Varta
110 Views
Share

रत्नागिरी (वैभव पवार) : आधुनिक मराठी कवितेचे जनक, क्रांतीदर्शी कविवर्य केशवसुत यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी, मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात विविध उपक्रमांनी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती आणि कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मालगुंड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते केशवसुतांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ‘कोमसाप’ मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर यांनी केशवसुतांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या साहित्यातील क्रांतिकारक विचारांचा सविस्तर आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. केशवसुतांनी मराठी कवितेला पारंपरिकतेच्या चौकटीतून बाहेर काढून नवी दिशा दिली, असे सांगत त्यांनी कवींच्या सामाजिक आशयाच्या अजरामर कवितांचे सादरीकरणही केले. या काव्यसादरीकरणातून उपस्थितांना केशवसुतांच्या प्रखर लेखणीची पुन्हा एकदा प्रचिती आली.

या अभिवादन सभेला कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील, ‘कोमसाप’च्या अध्यक्षा नलिनी खेर, सचिव विलास राणे, डॉ. संतोष केळकर, रामानंद लिमये, अरुण मोर्ये, शिरीष लिंगायत, शुभदा मुळ्ये, उज्वला बापट, रामभाऊ गराटे यांच्यासह स्मारक व्यवस्थापन समिती व कोमसापचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मारकाला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत केशवसुतांच्या स्मृतींना अभिवादन केले आणि काव्यसादरीकरणाचा आनंद घेतला.

Total Visitors :

5468408
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरूख-मार्लेश्वर मार्गावरील डंपरच्या सुसाट वेगाला बसणार वेसण; बेदरकार चालकांवर देवरूख पोलिसांची करडी नजर, पोलीस निरीक्षकांकडून कडक सूचना

Gramin Varta
2 Min Read

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Gramin Varta
3 Min Read

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयच्या एफआयआरनंतर नवा कायदेशीर संघर्ष; सतीश सालियन थेट ‘मातोश्री’वर बजावणार मानहानीची नोटीस

Gramin Varta
3 Min Read

राजापुर: कोदवली धरण सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र;आठवडा बाजारावर सायंकाळी ७ चे बंधन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बांधणीचा निर्धार; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

2 Min Read
रत्नागिरी

जयगड-नांदिवडे मार्गावर बेदरकारपणे क्रेन चालवणे भोवले; उत्तर प्रदेशातील चालकावर जयगड पोलिसांत गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या सीसीटीव्ही यंत्रणेवर प्रश्नचिन्ह; माहिती देण्यास विलंब झाल्याचा आरोप

3 Min Read
रत्नागिरी

मालगुंडच्या केशवसुत स्मारकात आधुनिक मराठी कवितेच्या जनकाला विनम्र अभिवादन; साहित्याचा रंगला जागर

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?