ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कोळंबे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश; भालाफेकमध्ये नितेज झोरे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कोळंबे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश; भालाफेकमध्ये नितेज झोरे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड
संगमेश्वर

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कोळंबे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश; भालाफेकमध्ये नितेज झोरे याची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 1:40 pm
Gramin Varta
117 Views
Share

संगमेश्वर: कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळ संचालित श्रीमती कमळजाबाई पांडुरंग मुळये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या (कोळंबे, ता. संगमेश्वर) विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रशालेचा नावलौकिक वाढवला आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये येथील खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आपले वर्चस्व सिद्ध केले.

या स्पर्धेतील १९ वर्षे वयोगटातील भालाफेक प्रकारात विद्यालयाचा खेळाडू कुमार नितेज रामचंद्र झोरे याने उत्कृष्ट क्रीडकौशल्याचे प्रदर्शन करत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला. या घवघवीत यशामुळे त्याची पुढील टप्प्यातील विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नितेजच्या या यशामुळे संगमेश्वर तालुक्यासह कोळंबे परिसराच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल कोळंबे परिसर विद्या प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. खांबे सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा शिक्षक सौ. मुळये मॅडम यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व पालकांनी नितेज झोरे व यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच आगामी विभागीय क्रीडा स्पर्धेतील कामगिरीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या विराट मोर्चाची दिशा आणि रूपरेषा स्पष्ट

Gramin Varta
2 Min Read

निवे खुर्द येथे उताराच्या धोकादायक वळणावर खडीने भरलेला डंपर उलटला; चालकाविरोधात गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

राज्यात मार्चअखेर कृषिपंपांना शंभर टक्के दिवसा वीजपुरवठा;महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांची माहिती

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी तालुक्यात वाढत्या डेंग्यू प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज; व्यापक सर्वेक्षणाचे नियोजन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवरुख-तेलीवाडी व भोरपवणे येथे कृषी अधिकाऱ्यांनी बांधावर उतरून नोंदवले नुकसानीचे पंचनामे

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा; ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

2 Min Read
संगमेश्वर

कोकणची लोककला आणि भजन परंपरा जपणार्‍या निढळेवाडीतील तीन बालगायिकांचा विशेष सन्मान

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रेच्या मुलांचा झेंडा; मुलींना उपविजेतेपद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?