ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबईत मनोरी किनाऱ्यावर अडकलेल्या संशयास्पद जहाजात चार जणांचा गुदमरून गूढ मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबईत मनोरी किनाऱ्यावर अडकलेल्या संशयास्पद जहाजात चार जणांचा गुदमरून गूढ मृत्यू
महाराष्ट्र

मुंबईत मनोरी किनाऱ्यावर अडकलेल्या संशयास्पद जहाजात चार जणांचा गुदमरून गूढ मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 9:09 am
Gramin Varta
160 Views
Share

मुंबई : बोरीवली पश्चिम येथील गोराई-मनोरी सागरी किनाऱ्यावरील रेतीत गेल्या चार महिन्यांपासून रुतून पडलेल्या एका मोठ्या जहाजावर चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चार तरुणांचा गुदमरून गूढ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अडकलेल्या जहाजाच्या बंदिस्त अंतर्गत भागात अचानक झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे अथवा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या खळबळजनक प्रकारामुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ जणांची एक टोळी स्पीडबोटच्या साहाय्याने या जहाजावर चोरी करण्याच्या इराद्याने पोहोचली होती. त्यापैकी एकजण स्पीडबोटवरच थांबला, तर उर्वरित सात जण जहाजात घुसले. यातील चार जण जहाजाच्या तळघरातील भागात लोखंडी पाईप कापण्यासाठी आत उतरले असता तिथे अचानक विषारी वायूची गळती सुरू झाली आणि श्वास कोंडल्याने चौघांचाही आतच तडफडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोराई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय नौदलाची मदत मागवली. नौदलाच्या पथकाने जहाजाच्या आत उतरून अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतून हे चारही मृतदेह बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

तपासादरम्यान या जहाजाबाबत अत्यंत गंभीर आणि संशयास्पद माहिती पुढे येत आहे. गेल्या चार महिन्यांपासून किनाऱ्यावर बेवारस स्थितीत असलेल्या या जहाजाचा वापर समुद्रात अवैध डिझेल किंवा तेलाच्या तस्करीसाठी केला जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जहाजाच्या मालकाविरुद्ध आधीच गुन्हे दाखल असून तो सध्या परदेशात फरार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या जहाजावर यापूर्वीही दोन वेळा चोरी झाली होती; पहिल्या खेपेस अडीच लाख तर दुसऱ्या वेळी पाच लाख रुपयांचे साहित्य चोरट्यांनी पळवले होते. दोनदा मिळालेल्या यशामुळे तिसऱ्यांदा मोठा ऐवज लंपास करण्याच्या हव्यासापोटी आलेली ही टोळी अखेर मृत्यूच्या सापळ्यात अडकली. पाईप कापताना गॅस कटरमुळे दुर्घटना घडली की बंदिस्त जागेतील विषारी वायूमुळे हा घात झाला, तसेच इतके दिवस हे संशयास्पद जहाज सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून कसे सुटले, या सर्व दिशेने गोराई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबवणार

Gramin Varta
2 Min Read

कोकणाच्या हापूससह सर्व आंबा जातींची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद होणार

Gramin Varta
2 Min Read

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; महाडजवळ दीड कोटींची गोवा बनावटीची व्हिस्की जप्त, ट्रकसह चालकाला बेड्या

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

आता ‘मिसिंग’ची नोंद नाही, थेट अपहरणाचा एफआयआर; बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी पोलिसांची नवी एसओपी

3 Min Read
महाराष्ट्र

यवतमाळच्या सहकारी बॅंकेकडून 242 कोटींची फसवणूक; ईडीचे नऊ ठिकाणी छापे

2 Min Read
महाराष्ट्र

येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय; निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

5 Min Read
महाराष्ट्र

दिवेआगर समुद्र दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’वर थेट सील

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?