ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर कनकाडीतील उपोषण तात्पुरते स्थगित
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर कनकाडीतील उपोषण तात्पुरते स्थगित
संगमेश्वर

प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर कनकाडीतील उपोषण तात्पुरते स्थगित

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 8:46 pm
Gramin Varta
26 Views
Share

जलजीवन मिशन कामाची ग्रामसभेत प्रत्यक्ष पाहणी होणार; अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तोडगा

देवरूख / प्रतिनिधी : कनकाडी (ता. संगमेश्वर) येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामातील त्रुटी आणि गैरप्रकारांविरोधात विकास बारकू गुरव यांनी पुकारलेले उपोषण प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आणि लेखी आश्वासनानंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे. कामाच्या तक्रारींसंदर्भात विशेष ग्रामसभेत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिल्याने हा तोडगा निघाला.

कनकाडी येथील जलजीवन मिशनच्या कामात अनेक त्रुटी असल्याचा आरोप करत विकास गुरव यांनी प्रशासनाकडे दाद मागितली होती. मात्र, योग्य दखल न घेतल्याने त्यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला होता. या इशाऱ्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने तातडीने धावपळ सुरू केली. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला.

यावेळी झालेल्या बैठकीस व चर्चेदरम्यान सहाय्यक गट विकास अधिकारी अक्षय पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी घुले, देवरूख नगर पंचायतीचे कोचिरकर, ग्रामसेवक शिंदे यांच्यासह पंचायत समिती सदस्या जाधव मॅडम आणि कनकाडीचे माजी उपसरपंच हेमंत शिंदे उपस्थित होते.

ग्रामसभेत प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न सोडवणार ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या वतीने उपअभियंत्यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार, जलजीवन मिशनच्या कामाबाबत आयोजित विशेष ग्रामसभेत तक्रारदारांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामाची पाहणी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या या लेखी हमीनंतर आणि उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन विकास गुरव यांनी आपले उपोषण सद्यस्थितीत स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, जर ग्रामसभेत आणि प्रत्यक्ष पाहणीनंतरही कामातील त्रुटींवर ठोस उपाययोजना झाली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करू, असा इशाराही यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला. या यशस्वी शिष्टाईमुळे तूर्त कनकाडीतील उपोषणाचा तिढा सुटला असून प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

Total Visitors :

5428503
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Apple’s iPhone Revolution Takes a Green Turn with Sustainable Materials

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

Gramin Varta
2 Min Read

गुहागर : निवोशी-भेलेवाडीत दोन महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य; गणेशोत्सवातही स्ट्रीट लाईट बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

Unraveling the Complexities of the Human Mind and Behavior

7 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वरच्या चार एक्सप्रेससाठी ‘उंदीरमामा’ मैदानात!

1 Min Read
संगमेश्वर

गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्का; संगमेश्वरातील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

1 Min Read
संगमेश्वर

दाभोळेत भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?