ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: शिवसेना चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने सर्व शक्य चाचण्यांचा विचार करून निर्णय घेतलाय
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » शिवसेना चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने सर्व शक्य चाचण्यांचा विचार करून निर्णय घेतलाय
देश-विदेश

शिवसेना चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने सर्व शक्य चाचण्यांचा विचार करून निर्णय घेतलाय

Gramin Varta
Last updated: October 7, 2026 8:23 am
Gramin Varta
401 Views
Share

शिंदे गटाच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

दिल्ली: शिवसेना चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने सर्व शक्य चाचण्यांचा विचार करून निर्णय घेतलाय, असा महत्वपूर्ण युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने एसआयआर प्रकरणातील सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाला स्वतःची प्रक्रिया तयार करण्याचा अधिकार मान्य केलाय. निवडणूक रद्द करण्याचा किंवा कोणतं पद कोणाकडे असावं हे ठरवण्याचा हा विषय नसून निवडणूक आयोगाने कोणत्या चाचण्या वापरायच्या याचा विचार केलाय. पक्ष चिन्हाच्या आदेशांतर्गत राखीव आणि मुक्त चिन्हाची तरतूद राखीव असल्याचाही त्यांचा दावा आहे. राखीव चिन्ह हे लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार मान्यता मिळालेल्या पक्षांना दिली जातात. एखादा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे की प्रादेशिक पक्ष यावर नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेल्या 15 दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नव्हती. पण यानंतर मंगळवारी (6 ऑक्टोबर) दोन सत्रात ही सुनावणी पार पडली. आधी दुपारी साडेबारा ते एक अशा अर्धा तासाची सुनावणी पार पडली. त्यानंतर दुपारी 2 ते 3 अशा एक तासात दुसऱ्या सत्रातील सुनावणी पार पडली. या दोन्ही सत्रातील सुनावणीत न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्याकडून अतिशय महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर नीरज किशन कौल यांनी उत्तर देत युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला.

कौल पुढे म्हणाले की, हे सर्व मिळालेल्या मत आणि कोणत्या राज्यात निवडणूक लढवली, यावर अवलंबून असते. राखीव असलेले चिन्ह मालमत्ता असून त्यामुळे मतदार जोडले जातात, असा कौल यांनी युक्तिवाद केलाय. आयोगाला चिन्हाबाबत अधिकार आहेत. पक्षात फूट पडल्याने एका गटाला वैध राजकीय पक्ष म्हणून मान्यता देणे आणि फूट पडलेली नाही, असे दोन निर्णय देण्याचे अधिकार आयोगाला आहे. आता कोणता पक्ष खरा आहे, तोपर्यंत एखादे तात्पुरतं चिन्ह दिले जाऊ शकते. परंतु आयोगाकडून एका गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर पक्षाचं राखीव चिन्ह दिलं जातं, असेही ते पुढे म्हणालेत. त्यांनी या प्रकरणात अपात्रतेबाबतच्या प्रकरण आणि चिन्हाबाबतच्या प्रकरणाचाही आधींच्या निर्णयाचाही संदर्भ त्यांनी दिलाय.

मला काही प्रकरणाचा दाखला द्यायचा आहे, कारण ठाकरेंच्या वकिलांकडून त्या प्रकरणाचा दाखला देऊन चुकीचा अर्थ सांगण्यात आला होता, असा दावा नीरज किशन कौल यांनी युक्तिवादात केला. या दरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. त्यावर कौल यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना वेळेअभावी युक्तिवाद पूर्ण करता आला नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीनंतर आता उद्या देखील सुनावणी पार पडणार आहे.

सुभाष देसाई प्रकरणात आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे आहे, असे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. तसेच व्हीप हा राजकीय पक्षाचाच असतो, असा निकाल न्यायालयाने दिला होता. पण या प्रकरणाचा चुकीचा दाखला देण्यात आला, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला.

दरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी महत्त्वाचा प्रश्न सुनावणीत उपस्थित केला. अपात्र ठरवलेले सदस्य पक्षातून बाहेर गेले, तर उर्वरित सदस्यांना वेगळे पक्षचिन्ह मिळते. अशा परिस्थितीत पक्षचिन्हाचा अधिकार कुणाला मिळायला हवा? असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी उपस्थित केला. तसेच ज्यांनी घटनात्मक पाप केले, त्यांच्यासाठी पक्षचिन्हाचे महत्त्व लागू होईल की ज्यांनी त्या घटनात्मक पापाविरोधात तक्रार केली त्यांच्यासाठी?, असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अत्यंत जाणकार निवडणूक आयोगालाही पक्षात नेमके बहुमत कुणाकडे आहे, हे ठरवणे कठीण आहे. तळागळातील कार्यकर्त्यांच संख्या मोजून लोकशाही पद्धतीने निर्णय घेणे जवळपास अशक्य आहे. मग बहुमत कसे ठरवणार?, असा सवाल बागची यांनी केला आहे.

संघटनात्मक चाचणी घेताना एखाद्या पक्षाची अंतर्गत रचना मुळातच अलोकशाही स्वरुपाची असेल, तर त्या पक्षाच्या घटनेनुसार पदांवर असलेल्या व्यक्ती कायदेशीर असू शकतात, पण त्या रचनेतून पक्षाला प्रत्यक्ष तळागळात किती जनसमर्थन आहेत, हे स्पष्टपणे दिसते का? विधानमंडळाचील पक्ष हा त्यावेळी निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीत चांगला निकष होता. मात्र आता अपात्रतेचा प्रश्न समोर आहे, असं न्यायमूर्ती बागची म्हणाले.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संगमेश्वरमध्ये भंगार गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी; रात्रभर अग्निशमन दलाची झुंज, लाखोंच्या नुकसानीचा अंदाज

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : पितांबरी कंपनीच्या प्लॉटवर काम करताना कामगाराचा मृत्यू; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

Gramin Varta
1 Min Read

साडवलीत युवासेनेच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न; ६० हून अधिक रुग्णांची तपासणी

Gramin Varta
2 Min Read

पुर्ये तर्फे देवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्याचे मोठे नुकसान, वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा उत्तर प्रदेशाला सर्वाधिक फटका; पाच राज्यांत तब्बल सव्वादोन कोटींची घट

2 Min Read
देश-विदेश

झहीर खान यांची चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

2 Min Read
देश-विदेश

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोठा निर्णय; निकृष्ट ‘टेंपर्ड ग्लास’च्या विक्रीला चाप

2 Min Read
देश-विदेश

भारतीय क्रिकेटला मोठा धक्का; स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, भावूक पोस्टने दिला पांढऱ्या जर्सीला निरोप

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?