ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: साडवलीत युवासेनेच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न; ६० हून अधिक रुग्णांची तपासणी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » साडवलीत युवासेनेच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न; ६० हून अधिक रुग्णांची तपासणी
संगमेश्वर

साडवलीत युवासेनेच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न; ६० हून अधिक रुग्णांची तपासणी

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 7:44 am
Gramin Varta
42 Views
Share

देवरुख: ग्रामीण भागातील गरीब, गरजू आणि वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत साडवली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. युवासेना संगमेश्वर तालुका, चिपळूण येथील नॅब आय हॉस्पिटल आणि प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (एनएसएस व युबीए विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या समाजोपयोगी आरोग्य उपक्रमाचे उद्घाटन प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रद्युम्न रवींद्र माने यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले असून परिसरातील ६० हून अधिक रुग्णांनी याचा थेट लाभ घेतला.

शिबिरात नॅब आय हॉस्पिटल, चिपळूण येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. संगीता खरात यांनी उपस्थित सर्व रुग्णांची सखोल नेत्रतपासणी करून आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या केल्या. तपासणीअंती मोतीबिंदू आढळलेल्या पात्र रुग्णांची निवड करून पुढील शस्त्रक्रियेसाठी त्यांचे वर्गीकरण करण्यात आले. या सर्व गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असून त्यांना आवश्यक औषधोपचार तसेच शस्त्रक्रियेदरम्यान राहण्याची व भोजनाची संपूर्ण व्यवस्था विनामूल्य पुरवली जाणार आहे.

या उद्घाटनप्रसंगी दिव्यांग मित्र संदीप नलावडे, समाजसेविका सौ. रेवा कदम, कै. सौ. मीनाताई ठाकरे हायस्कूलचे मुख्याध्यापक बळवंत नलावडे आणि इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे उपस्थित होते. विशेष म्हणजे या शिबिराच्या पूर्वतयारीपासून ते यशस्वी आयोजनापर्यंत इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्ष बी. फार्मचा दिव्यांग विद्यार्थी वाहिब कडवईकर याने स्वतः पुढाकार घेऊन अहोरात्र परिश्रम घेतले. त्याच्या या अनोख्या सामाजिक बांधिलकीचे आणि सेवाभावी वृत्तीचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. याशिवाय महाविद्यालयाचे एनएसएस समन्वयक प्रा. प्रशील चरकरी, एनएसएस सह-समन्वयक प्रा. वैष्णवी दुडये, युबीए समन्वयक प्रा. वैष्णवी नलावडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. डोळ्यांच्या गंभीर विकारांवर मोफत उपचारांची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल लाभार्थी रुग्ण आणि ग्रामस्थांनी आयोजकांचे आभार मानले.

Total Visitors :

5468436
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली तीव्र; आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Gramin Varta
3 Min Read

लाडक्या बहिणींसाठी दिलासा; ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता २४ सप्टेंबरनंतर बँक खात्यात जमा होण्याची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

झाडांचे बारसे हा उपक्रम दिशादर्शक व अनुकरणीय : प्रा. डॉ. प्रदीप ढवळ

Gramin Varta
3 Min Read

दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा ओझर नं. १ ची राज्यस्तरावर ऐतिहासिक झेप; क्रीडा क्षेत्रात गाठले यशाचे नवे शिखर

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; मुलाचा दुर्दैवी अंत

1 Min Read

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नात एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

1 Min Read
संगमेश्वर

फुणगूस ग्रामपंचायतीत रोजगार सेवक नियुक्तीवरून वाद; सरपंच व ग्रामसेवकांकडून टोलवाटोलवी सुरू असल्याचा सुभाष लांजेकर यांचा आरोप

2 Min Read
संगमेश्वर

उत्कृष्ट कामगिरीबद्दल राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा संगमेश्वरवासीयांतर्फे जाहीर सत्कार

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?