ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘वारससेतू’ पोर्टलचे चिपळुणात लोकार्पण; वारस नोंदीसह शासकीय योजनांचे लाभ आता एकाच छताखाली
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘वारससेतू’ पोर्टलचे चिपळुणात लोकार्पण; वारस नोंदीसह शासकीय योजनांचे लाभ आता एकाच छताखाली
चिपळूण

‘वारससेतू’ पोर्टलचे चिपळुणात लोकार्पण; वारस नोंदीसह शासकीय योजनांचे लाभ आता एकाच छताखाली

Gramin Varta
Last updated: October 9, 2026 8:31 am
Gramin Varta
66 Views
Share

रत्नागिरी: कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर दुःखात असलेल्या कुटुंबीयांची शासकीय कार्यालयांत होणारी धावपळ, चकरा आणि वेळेचा अपव्यय आता कायमचा थांबणार आहे. ‘सेवा संकल्प अभियाना’तंर्गत मृत्यूनंतरची वारस नोंदणी आणि विविध शासकीय योजनांचे लाभ एकाच प्रक्रियेत आणि एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या क्रांतिकारक ‘वारससेतू’ या एकात्मिक ऑनलाइन पोर्टलचे लोकार्पण चिपळुणात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहात झाले. प्रशासकीय पारदर्शकता आणि गतिमानतेचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या या प्रणालीची अंमलबजावणी चिपळूण उपविभागातील चिपळूण व गुहागर तहसील कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी दिली.

सध्याच्या पद्धतीनुसार ग्रामपंचायतीत मृत्यूची नोंद झाल्यानंतर महसूल, कृषी, अन्न व नागरी पुरवठा किंवा सामाजिक न्याय विभागापर्यंत ती माहिती पोहोचण्यास मोठा प्रशासकीय विलंब होत असे. परिणामी अनेकदा मृत व्यक्तींच्या खात्यावर योजनांचे लाभ सुरू राहणे अथवा कायदेशीर वारसांना वेळेत लाभ न मिळणे अशा तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर ‘वारससेतू’ पोर्टल एका नोंदीतून अनेक विभागांना जोडणारा ‘सेतू’ ठरणार असून, ग्रामपंचायतीतील मृत्यू नोंद तत्काळ सर्व संबंधित शासकीय कार्यालयांपर्यंत डिजिटल माध्यमातून पोहोचवली जाणार आहे.

या गतिमान प्रणालीमुळे महसूल व ग्रामपंचायत विभागामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत वारस फेरफार नोंद करणे आणि ग्रामपंचायत स्तरावर मालमत्ता वारसांच्या नावे हस्तांतरित करण्याची कार्यवाही अत्यंत वेगवान होणार आहे. सोबतच कृषी विभागाकडून ‘पीएम-किसान’ (PM-KISAN) योजनेचा लाभ थेट पात्र वारसांच्या नावे हस्तांतरित करून लाभार्थी नोंदी तत्परतेने अद्ययावत केल्या जातील. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या पातळीवर शिधापत्रिकेतील (Ration Card) मृत व्यक्तीचे नाव कमी करणे व वारसांचे नाव समाविष्ट करणे आता सहज सोपे होईल. याशिवाय सामाजिक न्याय विभागाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजनेतील अनुदान थांबवून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा निधी पात्र वारसांपर्यंत विनाविलंब पोहोचवणे शक्य होणार आहे. नागरिकांना प्रत्येक टेबलावर वेगळे अर्ज आणि कागदपत्रे देण्याच्या त्रासातून कायमची मुक्ती देणारा हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार असून, प्रशासकीय सेवा अधिक पारदर्शक करण्याचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.

Total Visitors :

5468412
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेडच्या चंदुलाल शेट प्रशालेत ‘विकसित भारत’ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; कलेच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचे दर्शन

Gramin Varta
1 Min Read

कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करा; राजापूरमधील कंत्राटदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांनंतरही रखडलेलाच; खर्च ५,५०० कोटींनी वाढून १६,९०९ कोटींवर

Gramin Varta
4 Min Read

देवरुख-बामणोली मार्गावर मारळजवळ पुन्हा खडीचा डंपर उलटला; बेदरकार वाहतुकीविरोधात ग्रामस्थांचा संताप

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेच्या मटण व मच्छी मार्केट इमारतीचा होणार कायापालट; नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

1 Min Read
चिपळूण

कुंभार्ली घाटातील खड्डे आठ दिवसांत बुजवा; अन्यथा काम बंद पाडू!

2 Min Read
चिपळूण

Profiling the Visionaries Behind Cutting-Edge Startup Ventures

7 Min Read
चिपळूण

चिपळूण तालुक्यातील पेढे येथून पश्चिम बंगालचा तरुण बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?