ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: भीषण दुष्काळातही गरिबांची दिवाळी अंधारात; आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ वाटपाला कात्री
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » भीषण दुष्काळातही गरिबांची दिवाळी अंधारात; आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ वाटपाला कात्री
महाराष्ट्र

भीषण दुष्काळातही गरिबांची दिवाळी अंधारात; आर्थिक चणचणीमुळे राज्य सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ वाटपाला कात्री

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 8:10 am
Gramin Varta
91 Views
Share

मुंबई: राज्यात सध्या तीव्र दुष्काळाचे भीषण सावट असताना यंदाच्या दिवाळीत मात्र सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेच्या वाट्याला घोर निराशा आली असून आर्थिक चणचणीचे कारण पुढे करत राज्य सरकारने ‘आनंदाचा शिधा’ न देण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात गरिबांच्या घरांत गोडधोड व्हावे यासाठी ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू झालेली ही दिलासादायक योजना आता केवळ कागदावरच उरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी तसेच राज्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळीच्या मुहूर्तावर प्रत्येकी एक किलो साखर, एक लिटर खाद्यतेल आणि प्रत्येकी ५०० ग्रॅम रवा, चणाडाळ, मैदा व पोहे असा संच दिला जात होता. मात्र, दर खेपेस सुमारे ५५० ते ६०० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणाऱ्या या योजनेबाबत यंदा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे कोणतीही अधिकृत सूचना न आल्याने खर्चाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आलेला नाही, असे खात्याच्या उच्चपदस्थांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी ऐन सणात गोरगरिबांच्या चुलीवर दुष्काळाची सावली अधिक गडद झाली असून यावरून राजकीय वर्तुळातून सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू झाला आहे. सरकारला दिवाळीसाठी आनंदाचा शिधा देणे शक्य नसेल तर दुष्काळग्रस्त जनतेला दुष्काळाचा तरी शिधा द्यावा, अशी संतप्त मागणी काँग्रेसचे सचिव ॲड. सचिन सावंत यांनी केली आहे; तर केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाहिरातबाजी करत सुरू केलेली ही योजना जर निधीअभावी गुंडाळली असेल, तर सरकारने ती अधिकृतपणे बंद केल्याचे जाहीर करावे, असा घणाघात उद्धवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केला आहे.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

झाडांचे बारसे हा उपक्रम दिशादर्शक व अनुकरणीय : प्रा. डॉ. प्रदीप ढवळ

Gramin Varta
3 Min Read

रायगड किल्ल्यावरील टकमक टोकावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या; पत्नीला मेसेज पाठवून संपवले जीवन

Gramin Varta
1 Min Read

खेड येथील शासकीय तंत्रनिकेतन व आयटीआयच्या रखडलेल्या इमारतींच्या बांधकामासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक उपोषणाचा इशारा; अनुज जोशी यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Gramin Varta
2 Min Read

साखरप्यात श्री जुगाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

कामगार हक्कांच्या लढ्याला सन्मान; अनिल जाधव यांना ‘सह्याद्री जीवनगौरव पुरस्कार’

2 Min Read
महाराष्ट्र

आई एकवीरेचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात दांपत्यावर काळाचा क्रूर घाला, दोन दिवसांनंतर झुडपात आढळले मृतदेह

2 Min Read
महाराष्ट्र

मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार; कोकण आणि कृष्णाखोऱ्याचे पाणी आणणार, छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

3 Min Read
महाराष्ट्र

करदात्यांना केंद्राचा मोठा दिलासा; ITR File भरण्याची मुदत वाढवली

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?