ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवून चिपळूणमधील हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; तोतया अधिकाऱ्याचा फसवणुकीचा डाव उघड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवून चिपळूणमधील हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; तोतया अधिकाऱ्याचा फसवणुकीचा डाव उघड
चिपळूण

अन्न सुरक्षा अधिकारी असल्याचे भासवून चिपळूणमधील हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; तोतया अधिकाऱ्याचा फसवणुकीचा डाव उघड

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 8:59 am
Gramin Varta
92 Views
Share

चिपळूण: अन्न व औषध प्रशासन विभागाचा बनावट फूड इन्स्पेक्टर बनून कारवाईची धाक दाखवत हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण शहरात समोर आला आहे. येथील महालक्ष्मी चायनीज सेंटरचे चालक रणवीर सावंत यांना गुरुवारी संदीप शिंदे नावाच्या अज्ञात व्यक्तीने फोन करून स्वतःची ओळख अन्न सुरक्षा विभागाचा अधिकारी अशी करून दिली. हॉटेलचे आवश्यक परवाने आणि कामगारांचे वैद्यकीय तपासणी अहवाल नसल्याचा आक्षेप घेत, दुकान सलग २४ दिवसांसाठी तात्काळ सील करण्यात येईल आणि न्यायालयात ६५ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला जाईल, अशी थेट भीती संबंधिताने घातली. या कारवाईच्या भीतीपोटी व्यावसायिकाने तोडगा विचारताच कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी करून व्हॉट्सॲपवर स्कॅनर पाठवून पैसे ऑनलाइन पाठवण्याचा दबाव या तोतयाने आणला.

या संशयास्पद संभाषणाबाबत रणवीर सावंत यांनी तत्काळ माजी नगरसेवक तथा हॉटेल व्यावसायिक संजय तांबडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. फोनवरील संशयास्पद बोलणे आणि कारवाईची विसंगत पद्धत लक्षात आल्यानंतर तांबडे यांनी अन्न सुरक्षा विभागाचे अधिकृत अधिकारी परदेशी यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली असता, संबंधित नावाची कोणतीही व्यक्ती या विभागात कार्यरत नसल्याचे उघडकीस आले. हा फसवणुकीचा प्रकार वेळीच उघडकीस आल्याने व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक टळली असली, तरी या घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि हॉटेल चालकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा प्रकारे तोतया अधिकाऱ्यांचे फोन आल्यास व्यावसायिकांनी कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी न पडता थेट अधिकृत शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा आणि परस्पर संवाद साधून माहितीची खात्री करावी, असे आवाहन संजय तांबडे यांनी केले आहे.

Total Visitors :

5470248
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत विरोधक आक्रमक राहणार – राहुल गांधी

Gramin Varta
3 Min Read

पाचल येथे महिला शेतकऱ्यांना आंबा-काजू मोहोर संरक्षणाचे शास्त्रीय धडे; ‘आत्मा’च्या प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
2 Min Read

शिक्षकी पेशाला काळीमा! प्रेयसीची निर्घृण हत्या करून मृतदेह घरात पुरला अन् फरशी बसवली; ‘दृश्यम’ स्टाईल पुरावा नष्ट करणाऱ्या नराधम मास्तरला बेड्या

Gramin Varta
3 Min Read

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी गुवाहाटीत तरुणाला अटक

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण तालुक्यात इतिहासात पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये टँकरची मागणी; पावसाच्या तुटवड्यामुळे तीव्र पाणीटंचाईची चाहूल

2 Min Read
चिपळूण

चिपळूणमध्ये राधाई फाउंडेशनचा ‘नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न; कर्तृत्ववान महिलांचा गौरव

2 Min Read
चिपळूण

दहिवली बुद्रुकमधील घाग बंधूंचा जलक्रांतीचा आदर्श; १६ वर्षांत शेकडो वनराई बंधारे बांधून वन्यजीवांचीही भागवली तहान

2 Min Read
चिपळूण

सावर्डे : माहेरून पैसे आणण्यास नकार देताच पत्नीला दांडक्याने मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?