ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गुहागरमधील ६८ वर्षीय व्यावसायिकाची १५ लाखांची ऑनलाइन फसवणूक; सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून गंडा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गुहागरमधील ६८ वर्षीय व्यावसायिकाची १५ लाखांची ऑनलाइन फसवणूक; सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून गंडा
गुहागर

गुहागरमधील ६८ वर्षीय व्यावसायिकाची १५ लाखांची ऑनलाइन फसवणूक; सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून गंडा

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 7:29 am
Gramin Varta
12 Views
Share

गुहागर : सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून तसेच तपासाच्या नावाखाली अटकेची धमकी देत गुहागर तालुक्यातील कीर्तनवाडी येथील एका ६८ वर्षीय व्यावसायिकाची तब्बल १५ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संदीप दिवाण (रा. बंगळुरू, पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्याविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सहदेव गडदे (वय ६८, व्यवसाय निवृत्त, सध्या रा. मुलुंड पूर्व, मुंबई; मूळ रा. कीर्तनवाडी, कालवा रोड, ता. गुहागर) हे गणपती उत्सवानिमित्त गुहागर येथे आले असताना २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. संबंधित व्यक्तीने आपण बंगळुरू येथील सीबीआय कार्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत सदाकत खान यांच्या नावाने कॅनरा बँकेच्या मुलुंड शाखेत खाते उघडून त्यातून तीन कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगितले. या व्यवहारांपैकी १० टक्के म्हणजेच ३० लाख रुपये विजय गडदे यांच्या खात्यात जमा झाल्याचा दावा करून त्यांच्या नावाने संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे भासवण्यात आले.

त्यानंतर संशयिताने गडदे यांना त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर कथित तक्रारीची प्रत पाठवली. मात्र, ही प्रत मिळणार नसल्याचे सांगून संबंधित व्यक्तीने स्वतःच तक्रारीची प्रत पाठविल्याचा संदेश डिलीट केला. तसेच तपासासाठी त्यांच्या खात्यातील रक्कम एका खात्यावर जमा करावी लागेल, अन्यथा अटक होऊ शकते, अशी धमकी देऊन त्यांच्यावर दबाव निर्माण केला.

दरम्यान, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुलुंड येथील निवासस्थानी असतानाही संशयिताने वारंवार व्हॉट्सॲप कॉल करून तपासाच्या नावाखाली २५ लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास संशयिताने पुन्हा संपर्क साधून विजय गडदे यांना त्यांच्या एसबीआय बँकेच्या चेकबुकवरील खाते क्रमांक देण्यास सांगितले. त्यानुसार गडदे यांनी खाते क्रमांक दिल्यानंतर संशयिताने १५ लाख रुपयांचा चेक तयार करून तो एसबीआय बँकेच्या मुलुंड पूर्व शाखेत जमा करण्यास सांगितले. या माध्यमातून गडदे यांची १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी विजय गडदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ब) नुसार ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी अद्याप अटक झालेला नसून या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

संपादकीय टीप : मूळ तक्रारीतील तपशीलांनुसार फसवणुकीची रक्कम १५ लाख रुपये आहे. त्यामुळे बातमीत तीच रक्कम नमूद केली आहे. तसेच संशयिताने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवल्याचा आरोप आहे; प्रत्यक्ष सीबीआय अधिकारी असल्याची पुष्टी नाही.

Total Visitors :

5468419
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

आयटीआयच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे यश अभिमानास्पद; रत्नागिरीतील लॅबसाठी तात्काळ निधी देणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Gramin Varta
2 Min Read

दापोली अर्बन बँकेचे संचालक माधव शेट्ये यांचा अमेरिकन विद्यापीठाकडून डॉक्टरेटने गौरव

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरी : कापडगाव येथील वळणावर भरधाव ट्रक उलटून चालकाचा जागीच मृत्यू

Gramin Varta
2 Min Read

दाभोळ सागरी पोलीस ठाण्याची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ यांच्या हाती; पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर वचक ठेवण्याचा निर्धार

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

गुहागर

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’त गुहागरच्या खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात डंका: पटकावला द्वितीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार

2 Min Read
गुहागर

श्रृंगारतळीत फटाके विक्री स्टॉल्सचा सुळसुळाट; अग्निसुरक्षेच्या नियमांची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

2 Min Read
गुहागर

‘ग्रामीण वार्ता’च्या बातमीची प्रशासनाकडून दखल; पालशेत-जोईलवाडीत अखेर पाणीपुरवठा पूर्ववत

1 Min Read
गुहागर

गुहागर: उत्सवाच्या गर्दीचा गैरफायदा घेत असगोलीत सलग दोन दिवस चोऱ्या

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?