ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : नाखरे येथे विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : नाखरे येथे विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी

रत्नागिरी : नाखरे येथे विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 10:45 am
Gramin Varta
98 Views
Share

रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील नाखरे बोरभाटलेवाडी येथे विहिरीत पडून एका ३३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रियांका लक्ष्मण आडविलकर (वय ३३ वर्षे, रा. नाखरे बोरभातलेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मयत तरुणीचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे नाखरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रियांका आडविलकर ही गेल्या १६ वर्षांपासून मानसिक तणावाखाली होती. दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास मानसिक तणावात असतानाच ती घराबाहेर पडून विहिरीच्या दिशेने गेली. त्यावेळी तिचा तोल जाऊन किंवा अनावधानाने ती विहिरीच्या पाण्यात पडली. ही बाब कुटुंबीय व स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेऊन तिला विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर तिला उपचारासाठी पावस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास प्रियांका हिला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती तिचे वडील लक्ष्मण महादेव आडविलकर यांनी पोलिसांना दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र पावस यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पूर्णगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (अ.मृ. क्रमांक ४१/२०२६) अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5469326
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रायपाटण येथे नदीवर मासेमारीसाठी गेलेल्या प्रौढाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; परिसरात हळहळ

Gramin Varta
1 Min Read

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची यशस्वी मोहोर

Gramin Varta
2 Min Read

गुहागर तालुक्यातील पालशेत येथे साकारणार ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प

Gramin Varta
2 Min Read

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघांची घोषणा; स्मृती मानधना सर्व फॉरमॅटमध्ये नेतृत्व करणार

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

२० दिवसांच्या चिमुकल्याचा रत्नागिरीपर्यंत साडेसहा लाखांना सौदा; आईच्या कुशीतून हिरावलेल्या बाळाची २४ तासांत सुटका, १० जणांना बेड्या!

4 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

2 Min Read
रत्नागिरी

कुर्धे मेर्वी येथे ४५ फूट खोल विहिरीत पडलेल्या रानडुकराला वनविभागाने दिले जीवदान; सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात केले मुक्त

2 Min Read
रत्नागिरी

कन्यारक्षणाचा निर्धार: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत रत्नागिरीत आरोग्य यंत्रणेसाठी कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?