ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आयटीबीपीच्या जवानांनी सर केले ‘माऊंट-एबी’ शिखर;तब्बल 24,131 फुटांवर रोवला
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आयटीबीपीच्या जवानांनी सर केले ‘माऊंट-एबी’ शिखर;तब्बल 24,131 फुटांवर रोवला
देश-विदेश

आयटीबीपीच्या जवानांनी सर केले ‘माऊंट-एबी’ शिखर;तब्बल 24,131 फुटांवर रोवला

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 8:45 am
Gramin Varta
6 Views
Share

दिल्ली: भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) 23 जवानांनी उत्तराखंडमधील भारत-तिबेट सीमेवर असलेले 7,355 मीटर (24,131 फूट) उंचीचे आव्हानात्मक माउंट एबी गामिन शिखर यशस्वीपणे सर करत नवा विक्रम प्रस्थापित केला.

गाल्या 16 सप्टेंबर रोजी अत्यंत कडाक्याची थंडी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जवानांनी या दुर्गम शिखरावर तिरंगा फडकावला.

ही ऐतिहासिक मोहीम फोर्स लेव्हल माउंटेनियरिंग एक्स्पेडिशन 2026चा भाग होती. या मोहिमेचे नेतृत्व डेप्युटी कमांडंट परीक्षित शाह यांनी केले. आयटीबीपीचे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी 7 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील आयटीबीपी मुख्यालयातून या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. तब्बल 7 हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवरील या शिखरावर यशस्वी चढाई करणे अत्यंत कठीण आणि साहसी आव्हान होते. मोहिमेदरम्यान जवानांना अत्यंत विरळ हवा, ऑक्सिजनची मोठी कमतरता, गोठवणारी थंडी, विशाल हिमनद्या तसेच अचानक बदलणाऱ्या धोकादायक हवामानाचा सामना करावा लागला.या यशामागे अनेक आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण, अचूक नियोजन आणि प्रतिकूल वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी केलेला सराव महत्त्वाचा ठरला.

गढवाल हिमालयातील आव्हानात्मक शिखर

माउंट एबी गामिन हे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील गढवाल हिमालयात स्थित आहे. हे शिखर माउंट कामेटपासून सुमारे 2 किलोमीटर ईशान्य दिशेला असून मीड्स कोलमार्गे कामेट मॅसिफशी जोडलेले आहे. या पर्वताच्या उत्तरेकडील उतारांचा विस्तार तिबेटच्या दिशेने होतो.

1950 मध्ये एका अँग्लो-स्विस पथकाने तिबेटच्या दिशेने माना खिंडीमार्गे चढाई करत हे शिखर प्रथम सर केले होते. त्यानंतर 1953 मध्ये नंदू जयाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय गिर्यारोहकांच्या पथकानेही या शिखरावर यशस्वी चढाई केली होती.

हिमालयातील अतिउंच आणि आव्हानात्मक सीमावर्ती भागात तैनात असलेल्या आयटीबीपीच्या हिमवीरांसाठी ही मोहीम त्यांच्या उत्कृष्ट गिर्यारोहण कौशल्याचे, शारीरिक क्षमतेचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक ठरली आहे.

मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आयटाबीपीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर जवानांचे कौतुक करण्यात आले. “हिमवीरांनी माउंट एबी गामिन सर केले,” असा संदेश यावेळी प्रसिद्ध करण्यात आला.आयटीबीपीचे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी 23 सदस्यीय पथकातील सर्व जवानांचे अभिनंदन केले. त्यांच्या अदम्य धैर्याचे कौतुक करताना त्यांनी हे यश भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांसाठी मोठी प्रेरणा असल्याचे नमूद केले.

Total Visitors :

5428558
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Apple Pay Celebrates Milestone: Surpasses X Billion Transactions Mark

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

खेड: कळंबणी बुद्रुक येथे बंद घराची खिडकी फोडून घरफोडी; टीव्हीसह स्वयंपाकाची भांडी पळवली

Gramin Varta
1 Min Read

नीट पेपरफुटी प्रकरण: लातूरच्या मोटेगावकर कुटुंबाला जबर धक्का; आदित्य मोटेगावकरवर दोन वर्षांची कडक बंदी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन; सीजेपीचा इशारा

2 Min Read
देश-विदेश

भारतात पहिल्यांदाच ऐतिहासिक नोंद; आसामच्या दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यानात आढळली दुर्मीळ परजीवी गांधीलमाशीची अज्ञात प्रजाती

2 Min Read
देश-विदेश

“शिवसेनेसारखा वाद लांबवू नका!” तृणमूलच्या नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्ट कडक; निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत ‘टाइमलाइन’ देण्याचे आदेश

3 Min Read
देश-विदेश

दिल्लीत सामूहिक अत्याचारानंतर मुलीची हत्या

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?