ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गणपतीपुळे एमटीडीसी पर्यटक निवासात जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गणपतीपुळे एमटीडीसी पर्यटक निवासात जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
रत्नागिरी

गणपतीपुळे एमटीडीसी पर्यटक निवासात जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 1:47 pm
Gramin Varta
49 Views
Share

गणपतीपुळे/ वैभव पवार : रत्नागिरी तालुक्यातील जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासात रविवार, २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने महामंडळातर्फे विविध समाजोपयोगी, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

यंदा जागतिक स्तरावर ‘डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे पर्यटनाची पुनर्रचना’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले असून, या संकल्पनेला अनुसरून स्थानिक पातळीवर पर्यटनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर भव्य स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि विचारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मालगुंड येथील मुरारी तथा भाई मयेकर जुनियर कॉलेजमध्ये निबंध स्पर्धा, तर गणपतीपुळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पर्यटक निवासात मुक्कामी असणाऱ्या पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाईल, तसेच पर्यटनासाठी नव्याने दाखल होणाऱ्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. एमटीडीसीच्या वतीने आयोजित या सर्व उपक्रमांमध्ये गणपतीपुळे व परिसरातील पर्यटनप्रेमी, स्थानिक पर्यटन व्यावसायिक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एमटीडीसी गणपतीपुळे पर्यटक निवासाचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेड: चाकाळे येथे जुन्या वैमनस्यातून भरदिवसा रक्तरंजित राडा; बांबूच्या काठीने बेदम मारहाण करत एकाला केले गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

खेड तालुक्यातील सहकार क्षेत्राचा स्तुत्य उपक्रम; ‘सेवा संकल्प अभियाना’तून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचे किराणा सामान सुपूर्द

Gramin Varta
2 Min Read

गुहागर: काजळी येथे एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात

Gramin Varta
2 Min Read

गणेश चतुर्थीपूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मच्छिमारांचे प्राण वाचवणाऱ्या ७ जणांचा सत्कार

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

1 Min Read
रत्नागिरी

हिमालयीन मोहिमेचे रत्नागिरी पोलिसांना समर्पण; होमगार्ड जवान आकाश पालकर यांचा अनोखा संकल्प

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : कोकणनगर येथे रेशन धान्याचे सुरळीत वितरण; ९८ टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले धान्य

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?