ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रिंगणे येथे घरफोडी करून पळणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांना ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रिंगणे येथे घरफोडी करून पळणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांना ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले
लांजा

रिंगणे येथे घरफोडी करून पळणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांना ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले

Gramin Varta
Last updated: September 27, 2026 8:25 am
Gramin Varta
2.5k Views
Share

लांजा (विशेष प्रतिनिधी): लांजा तालुक्यातील रिंगणे गांगोवाडी येथे भरदिवसा एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःच्या खाजगी वाहनाने थरारक पाठलाग करून राजापूर तालुक्यातील कारवली येथे जेरबंद केले. पकडण्यात आलेले दोन्ही संशयित बीड जिल्ह्यातील असून, त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे घातक साहित्य आणि नंबरप्लेट नसलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिंगणे गांगोवाडी येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या कामानिमित्त कुर्ला (मुंबई) येथे वास्तव्यास असलेले संतोष श्रीधर आयरे यांचे घर बंद होते. शनिवारी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास संशयित चोरट्यांनी या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा मोठ्या स्क्रू पानाच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला. घरफोडीची ही घटना लक्षात येताच रिंगणे गावचे सरपंच संजय आयरे, महेश विश्वासराव कोंडगे आणि कुरंग येथील गणेश सुर्वे यांनी तात्काळ सतर्कता दाखवली. आरोपी चोरी करून घटनास्थळावरून पळ काढत असल्याचे समजताच या तिघांनी जराही वेळ न दवडता आपल्या खाजगी वाहनाने चोरट्यांचा थरारक पाठलाग सुरू केला.

लांजा ते राजापूर दरम्यान अनेक किलोमीटरचा पाठलाग करत त्यांनी राजापूर हद्दीतील कारवली येथे चोरट्यांना गाठून अत्यंत धाडसाने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या धाडसी कारवाईत संजय उर्फ मोहन निकाजा भोसले (वय २१) आणि नितेश उर्फ संतोष मरदान भोसले (वय २५, दोघेही रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली सुमारे ७० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन मोटारसायकल (नंबरप्लेट नसलेली), मोठा पोपट पाना, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी सुरा, कटर, हॅन्ड ग्लोव्हज, मास्क तसेच ओळखपत्र अशी सामग्री जप्त करण्यात आली आहे. यातील नितेश भोसले याच्यावर सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलीस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी फिर्यादी जयेश संदीप आयरे (वय २६, रा. रिंगणे गांगोवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४७/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१ (३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेलार (ब. नं. ४०९) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळे व धाडसामुळे एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाला असून परिसरात त्यांचे मोठे कौतुक होत आहे.

Total Visitors :

5435549
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेड आणि पूर्णगड येथून दोन २१ वर्षीय तरुणींचे गूढ अपहरण; गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

एक कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक; रत्नागिरीत ४० ते ४५ नागरिक जाळ्यात

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : आडिवऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यस्तरीय सोलो व ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा

Gramin Varta
1 Min Read

राजापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा : दारूच्या नशेत विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू

3 Min Read
लांजा

लांजा : पिकअपमधून बैलांची क्रूर वाहतूक;  पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

3 Min Read
लांजा

विलवडे रेल्वे स्थानकावरील उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिसांची संघर्ष समितीसोबत बैठक

2 Min Read
लांजा

लांजा : असोडे येथे शेतजमिनीच्या वादातून प्रौढावर प्राणघातक हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?