ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना राज्य सेवेत मोठा दिलासा; गट-क गणवेशधारी पदांवर १० टक्के समांतर आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना राज्य सेवेत मोठा दिलासा; गट-क गणवेशधारी पदांवर १० टक्के समांतर आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना राज्य सेवेत मोठा दिलासा; गट-क गणवेशधारी पदांवर १० टक्के समांतर आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 8:22 am
Gramin Varta
37 Views
Share

मुंबई: सैन्यदलातील सेवा बजावून परतणाऱ्या महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांचे शासकीय तसेच निमशासकीय सेवेत पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाच्या गट-क गणवेशधारी सेवांच्या भरतीत महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या माजी अग्निवीरांना १० टक्के कप्पीकृत समांतर आरक्षण (Compartmental Horizontal Reservation) देण्यासह त्यांचे सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.

केंद्र सरकारने २०२२ मध्ये भारतीय सैन्यदलातील भूदल, नौदल आणि वायुदलासाठी अग्निपथ योजना सुरू केली होती. यात साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी भरती करून त्यांना शिस्त, नेतृत्व, तांत्रिक कौशल्य, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेचे कठोर प्रशिक्षण दिले जाते. या सेवेनंतर २५ टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी सामावून घेतले जात असले, तरी उर्वरित ७५ टक्के अग्निवीर सेवानिवृत्त होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अशा माजी अग्निवीरांना गृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग आणि नगर विकास विभाग आदी प्रशासकीय विभागांतील गट-क गणवेशधारी पदांवर सामावून घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीने केलेल्या शिफारशींना मंत्रिमंडळाने पूर्ण मान्यता दिली आहे. एखाद्या पदासाठी दहा टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची गरज भासल्यास, मूळ सामाजिक आरक्षण अबाधित ठेवून ही मर्यादा वाढवण्याचे अधिकारही या समितीला देण्यात आले आहेत.

या धोरणांतर्गत पोलीस महासंचालक कार्यालयांतर्गत पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस दल, कारागृह विभागातील कारागृह शिपाई, नागरी संरक्षण संचालनालयातील अग्निशामक, बचावकर्ता, विमोचक, सहायक उपनियंत्रक, महासंचालक गृहरक्षक दलातील हवालदार निदेशक, कनिष्ठ निदेशक, यांत्रिक निदेशक, निदेशक, प्रवर्तक, राज्य गुप्तवार्ता विभागातील पोलीस शिपाई खलाशी (इंजिन व डेस्क साईड), उत्पादन शुल्क विभागातील जवान आणि चालक, वन विभागातील वनरक्षक तसेच नगर विकास विभागांतर्गत महापालिकांमधील अग्निशामक व विमोचक या पदांचा समावेश असणार आहे.

विशेष म्हणजे, या पदांच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेतून माजी अग्निवीरांना पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. याशिवाय वयोमर्यादेत सूट, शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), ज्येष्ठता, पदोन्नती तसेच प्रशिक्षण व अनुभवाच्या निकषांबाबत लवकरच सविस्तर शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याने सैन्यदलात कर्तव्य बजावलेल्या राज्यातील जवानांसाठी शासकीय सेवेचे दरवाजे खुले झाले आहेत.

Total Visitors :

5435605
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दिवेआगर समुद्र दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; आळंदीतील ‘विनर्स अकॅडमी’वर थेट सील

Gramin Varta
2 Min Read

माध्यमिक विद्यालय वरवडे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर तालुका शालेय कबड्डी स्पर्धेत आठल्ये-सप्रे-पित्रेच्या मुलांचा झेंडा; मुलींना उपविजेतेपद

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण: प्रा. अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

अभ्यासाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन निघाली, अन् वाटेतच डंपरखाली चिरडून १९ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी अंत

2 Min Read
महाराष्ट्र

कोकणाच्या हापूससह सर्व आंबा जातींची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद होणार

2 Min Read
महाराष्ट्र

परतीचा पाऊसही ठरणार तोकडा; धरणांतील साठा आणि करपलेल्या खरिपाला दिलासा मिळणे कठीण, राज्यात दुष्काळाचे सावट गडद

3 Min Read
महाराष्ट्र

मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार; कोकण आणि कृष्णाखोऱ्याचे पाणी आणणार, छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?