ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न
राजापूर

राजापूर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 7:21 pm
Gramin Varta
76 Views
Share

५ ऑक्टोबरच्या जिल्हा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांचे आवाहन

राजापूर/ तुषार पाचलकर: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी उभय महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पक्षाचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा तथा माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी महापुरुषांच्या विचार आणि कार्यावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेंद्र तांबे (गुरुजी) यांच्या अमृतमहोत्सवी (७५ व्या) वर्षानिमित्त त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व सल्लागार वसंत आंबेलकर यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाल्याने बैठकीत शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक बांधणीवर सखोल चर्चा झाली. नवनियुक्त तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील नवीन कार्यकारिणीची रूपरेषा निश्चित करण्यात आली असून, तिची अधिकृत घोषणा पुढील आढावा बैठकीत केली जाणार असल्याचे ठरले. दरम्यान, येत्या ५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, राजापूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी केले.

या आढावा बैठकीस माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, तालुकाध्यक्ष सतीश बंडबे, ज्येष्ठ कार्यकर्ते देवदत्त वालावलकर, शहराध्यक्ष अजीम जैतापकर, लियाकत काझी, नगरसेवक सिद्धांत जाधव, सुलतान ठाकूर, स्वीकृत नगरसेवक महेश शिवलकर, नगरसेविका शबाना मुल्ला, अमिना गडकरी, जान्हवी वादक यांच्यासह अफरोज झारी, अदनान खलिफे, इम्रान मुजावर, हारून साठी, गुरुनाथ आडीवरेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मंडणगड: हातात चाकू घेऊन गावात दहशत निर्माण करणाऱ्यावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

Gramin Varta
1 Min Read

राजापूर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पाचलच्या सरस्वती विद्यामंदिरचे अजिंक्यपद

Gramin Varta
2 Min Read

आंबोली धबधब्यावर पर्यटकांच्या अंगावर अचानक पडला साप; चिमुकला थोडक्यात बचावला

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका मोलाची: डॉ. विकास पाटील

2 Min Read
राजापूर

पाचलचे उपसरपंच आत्माराम सुतार यांचा ५३ वा वाढदिवस उत्साहात साजरा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

2 Min Read
राजापूर

डीजे, फटाक्यांना फाटा देत पारंपरिक नृत्यांच्या गजरात ‘जैतापूरच्या राजा’ला भावपूर्ण निरोप; महिलांचे लेझीम अन् १० फुटी कोंबडा नृत्य ठरले मुख्य आकर्षण

3 Min Read
राजापूर

राजापूरमध्ये बेकायदा दारू विक्रीवर कारवाई; दोघांविरोधात गुन्हा

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?