ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राज्यात काही भागांतून मान्सूनची माघार; २० जिल्ह्यांत पावसाची तूट
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राज्यात काही भागांतून मान्सूनची माघार; २० जिल्ह्यांत पावसाची तूट
महाराष्ट्र

राज्यात काही भागांतून मान्सूनची माघार; २० जिल्ह्यांत पावसाची तूट

Gramin Varta
Last updated: October 5, 2026 8:15 am
Gramin Varta
115 Views
Share

मुंबई : राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे.

दरम्यान, राज्यातील ३६ पैकी २० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवारी ही माहिती दिली. पावसातील मोठ्या तुटवड्यामुळे राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वीच राज्य सरकारने ७० टक्क्यांहून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, कमी पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे.

राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतल्यास, पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी, कोल्हापूर, धुळे, बुलढाणा, जळगाव, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत सरासरीच्या आसपास पाऊस झाला आहे. मात्र, उर्वरित अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे.

मराठवाड्यातील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा ३४ ते ४९ टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ५८ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यानंतर बीडमध्ये ५१ टक्के, हिंगोलीत ४९ टक्के, जालन्यात ४८ टक्के, अहिल्यानगरमध्ये ४६ टक्के आणि धाराशिवमध्ये ४५ टक्के पावसाची कमतरता आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. सिंधुदुर्गमध्ये ३६ टक्के, साताऱ्यात २८ टक्के आणि सांगलीत २४ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.

दरम्यान, मान्सूनने उत्तर भारतातील उर्वरित काही भागांसह गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही भागांतून माघार घेतली आहे. मान्सूनच्या परतीची रेषा सूपौल, रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हरनाई या भागांतून जात आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित भागांतूनही मान्सूनची माघार कशी होते, याकडे हवामान विभागाचे लक्ष आहे.

हवामानशास्त्रीय निकषांनुसार, एखाद्या भागात सलग पाच दिवस पाऊस पूर्णपणे थांबणे, वातावरणातील आर्द्रतेत लक्षणीय घट होणे आणि जमिनीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवरील वाऱ्यांच्या दिशेत बदल होणे, या बाबींचा विचार करून मान्सूनच्या माघारीची घोषणा केली जाते. राज्यात पावसाची तूट कायम असल्याने आगामी काळात रब्बी हंगाम, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि शेतीवरील परिणाम याबाबत चिंता वाढली आहे.

Total Visitors :

5468536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या राजकीय नेत्यांना दिवाळीनिमित्त सदिच्छा भेटी; भास्कर जाधवांसोबत फराळाचा आनंद

Gramin Varta
1 Min Read

चित्ररुपम स्टुडिओच्या कथा स्पर्धेत १५ कथांची अंतिम फेरीसाठी निवड; ग्रामीण व सामाजिक वास्तवाचे दर्शन

Gramin Varta
2 Min Read

कोकणच्या किनारपट्टी विकासाला राज्य सरकारचे बळ; बंदरे आणि पोहोच रस्त्यांसाठी १७० कोटींचा निधी मंजूर, सागरी वाहतूक गतिमान होणार

Gramin Varta
2 Min Read

भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी चेक तंत्रज्ञानाची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी – मुख्यमंत्री

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

सीजेपी आणि एआयएसए १० ऑक्टोबरला जंतर-मंतरवर करणार आंदोलन

1 Min Read
महाराष्ट्र

तामिळनाडूत पिकलेला कोकणातील हापूस कोल्हापूर बाजार समितीत दाखल;  प्रतिपेटीला २५०० रुपयांचा दर

2 Min Read
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या तोंडावर ‘रेंट अ गरबा पार्टनर’च्या फसव्या जाहिराती; मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

2 Min Read
महाराष्ट्र

ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिवसेनेत प्रवेश

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?