ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मिरकरवाडा जेटीवरून मासेमारीसाठी गेलेल्या नेपाळी खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मिरकरवाडा जेटीवरून मासेमारीसाठी गेलेल्या नेपाळी खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू
रत्नागिरी

मिरकरवाडा जेटीवरून मासेमारीसाठी गेलेल्या नेपाळी खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 3:44 pm
Gramin Varta
49 Views
Share

रत्नागिरी : मिरकरवाडा जेटीवरून समुद्रात मासेमारीसाठी निघालेल्या नौकेवरून पाय घसरून समुद्रात पडल्याने एका २१ वर्षीय नेपाळी खलाशाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अश्विन रामचंद्र ड. थारू (वय २१, रा. मु.पो. जानकी, जि. कैलाली, नेपाळ; सध्या रा. मिरकरवाडा जेटी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरकरवाडा जेटीवरून सहिल उमर मुकादम यांच्या मालकीची ‘अल-उमर-२’ (नोंदणी क्र. ind-mh-4-mh-११६३) ही नौका अन्य खलाशांसह मासेमारीसाठी समुद्रात निघाली होती. या बोटीवर अश्विन थारू हा देखील कामावर होता. बोट समुद्रात जात असताना अश्विन हा लघुशंकेसाठी नौकेच्या कडेला गेला असता त्याचा अचानक पाय घसरला आणि तो खोल समुद्राच्या पाण्यात पडला. हा प्रकार लक्षात येताच नौकेवरील खलाशी विमल छोटेलाल थारू व सहकाऱ्यांनी तात्काळ समुद्रात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली; मात्र तो मिळून आला नाही. अखेर शेजारील ‘शेनकई धारेवारे’ या बोटीच्या मदतीने शोधमोहीम राबवली असता अश्विन हा समुद्राच्या पाण्यात निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आला. खलाशांनी त्याला तातडीने बोटीवर घेऊन मिरकरवाडा जेटीवर आणले व पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १२८/२०२६ अशी करण्यात आली असून, रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5468411
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा येथे गांजासदृश्य अंमली पदार्थाचे सेवन; ३५ वर्षीय तरुणावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

तरवळ जाधववाडीत ग्रामस्थांनी उभारला श्रमदानातून वनराई बंधारा; दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी एकजूट

Gramin Varta
1 Min Read

कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या ४९ व्या ‘गावंढळ’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न

Gramin Varta
3 Min Read

देवरुखच्या सामाजिक कार्यकर्त्या वैदेही सावंत यांचा पुण्यात ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरव; महिला सक्षमीकरणातील योगदानाची दखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

‘सेवा संकल्प अभियाना’ने तीन वर्षांच्या चिमुरडीला दिले नवे आयुष्य; दुभंगलेले ओठ आणि टाळूवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत आकाशप्रेमींनी अनुभवला अद्भुत खगोलीय सोहळा; चंद्रामागे लपला तेजस्वी शुक्र

1 Min Read
रत्नागिरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाची दुरवस्था; तोडफोडीच्या चौकशीसह सीसीटीव्ही आणि संरक्षक कठड्याची वंचितची मागणी

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णपान; केंद्रीय विद्यालयाचा प्रवेशोत्सव आणि टिळक विद्यालयाचे लोकार्पण संपन्न

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?