ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कौटुंबिक वादातून पत्नीने केला झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून खून
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कौटुंबिक वादातून पत्नीने केला झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून खून
महाराष्ट्र

कौटुंबिक वादातून पत्नीने केला झोपलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून खून

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 8:29 am
Gramin Varta
262 Views
Share

इचलकरंजी : कौटुंबिक वादातून पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात खलबत्ता घालून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना इचलकरंजीतील गावभाग परिसरात उघडकीस आली. सागर दीपक बुरसे (वय ३५, रा. त्रिशूल चौक, गावभाग) असे मृत पतीचे नाव आहे. या घटनेनंतर पत्नी वैशाली हिने मुलीला सोबत घेत पोलीस ठाणे गाठले आणि पतीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सागर बुरसे हे इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. सागर आणि वैशाली यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत असल्याचे समजते. या वादातून काही वर्षांपूर्वी दोघे विभक्त झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते पुन्हा एकत्र राहू लागले होते. संसार पुन्हा सुरू झाल्यानंतरही त्यांच्यातील वाद थांबले नव्हते.

घटनेच्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर दोघेही झोपी गेले. मात्र, झोपेत असलेल्या सागर यांच्या डोक्यात वैशाली हिने खलबत्ता घातल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी उठल्यानंतर वैशाली हिने नेहमीची कामे आटोपली. त्यानंतर वडील आणि भावाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पुढे भावासह मुलीला घेऊन तिने पोलीस ठाणे गाठले आणि पतीची हत्या केल्याची कबुली दिली.

घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून वैशाली हिला ताब्यात घेतले. सागर यांचा मृतदेह पाहताच त्यांच्या आई, बहिणी आणि अन्य नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5469136
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापुरात एटीएस आणि आयबीची संयुक्त धडक कारवाई; एकाच घरातील पती-पत्नीसह मुलीची कसून चौकशी

Gramin Varta
2 Min Read

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

मंडणगड-वेळास एसटी बसला धोकादायक वळणावर अपघात; तीन प्रवासी जखमी, मोठी जीवितहानी टळली

Gramin Varta
2 Min Read

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’त गुहागरच्या खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात डंका: पटकावला द्वितीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडे आग्रही, प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू – शरद पवार

4 Min Read
महाराष्ट्र

बाथरूममधील सात सामान्य चुका आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक; स्वच्छतेच्या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास संसर्गाचा धोका

4 Min Read
महाराष्ट्र

हुकूमशाहीविरोधात आता मुंबईत रणकंदन! आंदोलकांची सुटका होताच ठाकरे बंधूंचा एल्गार

2 Min Read
महाराष्ट्र

मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?