ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीतील पाणी परिषदेत भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजनांचे मंथन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीतील पाणी परिषदेत भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजनांचे मंथन
रत्नागिरी

रत्नागिरीतील पाणी परिषदेत भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजनांचे मंथन

Gramin Varta
Last updated: October 30, 2026 7:55 am
Gramin Varta
224 Views
Share

रत्नागिरी: भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य समस्या लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रभावी पाणी नियोजन याबाबत रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषदेत विचारमंथन झाले

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार प्रमोद जठार यांनी जलप्रश्नाशी संबंधित विविध विषयांची माहिती घेतली. प्रशासन, जलक्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यास जलसंधारणाच्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देता येईल, असा सूर परिषदेत व्यक्त करण्यात आला. या पाणी परिषदेतील सर्व मुद्द्यांवर आधारित आराखडा बनवून तो पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

डॉ. उमेश मुंडले यांनी सांगितले की, गावागावांतील सांडपाणी ओढे आणि नाल्यांमध्ये सोडल्यामुळे पिण्याच्या विहिरींचे पाणी दूषित होत आहे. यावर उपाय म्हणून रत्नागिरी शहरातील फणशी येथे २०१९ ‘फ्लोटिंग रिडबेड सिस्टीम’च्या माध्यमातून बॅक्टेरियल कल्चर आणि वनस्पतींचा वापर करून सांडपाण्यावर यशस्वी प्रक्रिया करण्यात आली होती. परंतु असे प्रकल्प नंतर व्हायला हवे होते. रोजच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येईल. समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा विचार मांडला जातो. यासाठी इस्रायलचे उदाहरण दिले जाते. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे खूप खर्चिक आहे, त्यामुळे या दृष्टीने विचार करण्याऐवजी, टप्प्याटप्प्याने पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढवण्याचा विचार करावा, अशी सूचना डॉ. मुंडले यांनी केली.

दापोलीतील जलतज्ज्ञ डॉ. प्रशांत परांजपे म्हणाले की, अतिथींना पूर्ण ग्लासाऐवजी अर्धा ग्लास पाणी देणे आणि हॉटेल किंवा घरात पिण्याचे पाणी सिंकमध्ये ओतून न देता काटकसरीने वापरण्याची सवय प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. आगामी उन्हाळ्यात पर्यटन व दैनंदिन जीवन सुरळित ठेवायचे असेल तर महाविद्यालयीन युवकांनी पुढे येऊन ‘जलदूत’ व ‘जलयोद्धे’ म्हणून काम करावे. राज्यातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला तत्काळ बंदी घालावी, तसेच बहुमजली इमारतींमधील सांडपाणी आणि ‘एसी’तून वाया जाणारे पाणी साठवून त्याचा पुनर्वापर करावा. प्रत्येक बहुमजली इमारतीत फ्लश टँकचे व सांडपाणी संकलित करून, त्यावर प्रक्रिया करून स्वतंत्र पाइपलाइनद्वारे टेरेसवरील टाकीत साठवून त्याचा वापर करावा. एका वेळेस फ्लशसाठी ५ लिटर पाणी लागते. एका रात्रीत एका ‘एसी’तून ५ ते ८ लिटर पाणी बाहेर पडते. ते साठवून झाडांना वापरावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

या वेळी जलसंधारणाची कामे, पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पातळी वाढविणे, जलस्रोतांचे संवर्धन, पाणीगळती रोखणे तसेच उपलब्ध पाण्याचा योग्य वापर यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील पारंपरिक जलस्रोतांचे जतन करण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.

यावेळी जलसेवा गौरव पुरस्कार गोगटे-जोगळेकर महाविद्यालय एनएसएस विभाग, अनसूया महिला स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष सौ. नीलम पालव, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे, राहुल तिवरेकर, झेप फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम ढेकणे, देवरूख येथील चैत्राली धस, गुहागरचे आशुतोष जोशी, दापोलीचे डॉ. प्रशांत परांजपे, चिपळूणचे शाहनवाज शहा, मजगाव येथील फैय्याज मुकादम, डॉ. उमेश मुंडले, हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, नगरपालिकेचे पाणी सभापती निमेश नायर यांचा गौरव करण्यात आला.

हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी सांगितले की, हॉटेल असोसिएशनच्या बैठकीत आता जे पाणी आहे, ते काळजीपूर्वक वापरा, अशा सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना पाऊण ग्लास पाणी देतो. ज्यांच्याकडे टब बाथ आहे, त्याचा वापर बंद करा, हे शौक नको. एसीतून जाणारे पाणी झाडांना घालतो. जास्तीत जास्त पाणी बचत करण्याकडे सर्व हॉटेलमालकांचा आहे. दुष्काळी कोकण हे प्रथमच होत आहे.

डॉ. चंद्रशेखर निमकर म्हणाले की, निवेंडी येथील माझ्या घरी सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो. हे सर्वांना शक्य आहे. प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून आता पुढील सात महिने पाणी वाचवू या आणि पुढील पावसाळ्यात पाणी अडवू या. त्याद्वारे भूजल पातळी वाढेल आणि पाण्याचा ताळेबंद राखता येईल. परंतु यासाठी शासन व लोकांच्या सहभाग आवश्यक आहे.

जिल्ह्यात शेकडो ‘जलदूत’ आणि ‘जलप्रेमी’ दररोज ऑनलाइन बैठका घेऊन प्रत्यक्ष फील्डवर जलसंधारणाचे काम करत आहेत. मात्र दुर्दैवाने पंचायत समिती आणि प्रशासनाच्या टंचाई आढावा बैठकांमध्ये किंवा आराखडे तयार करताना या कार्यकर्त्यांना निमंत्रित केले जात नाही. केवळ टँकर मागवण्यापेक्षा ‘टँकरमुक्त व जलयुक्त गाव’ संकल्पना राबवण्यासाठी या अनुभवी जलसेवकांचा प्रशासनाने तातडीने सहभाग करून घ्यावा, अशी मागणी चिपळूणचे शहानवाज शहा यांनी केली.

कार्यक्रमाला पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, मृद् आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुले, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई, दादा दळी आदी उपस्थित होते. संजय वैशंपायन यांनी सूत्रसंचालन केले. नंदू तांबे यांनी प्रास्ताविक केले.

Total Visitors :

5468453
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ उत्साहात संपन्न; समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Gramin Varta
2 Min Read

कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेत वाढ करण्याची गरज; दिवेआगार दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात डी-मार्टची रोजगार निवड प्रक्रिया

Gramin Varta
2 Min Read

‘जेलर २’ ओटीटीवर प्रदर्शित होणार; १२ नोव्हेंबरपासून ‘प्राइम व्हिडिओ’वर उपलब्ध

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीत मांडवी भुते नाक्यावर रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेला भरधाव ॲक्टिव्हाची धडक; दुचाकीस्वार पसार

2 Min Read
रत्नागिरी

कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे मूल्यवर्धन करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन

2 Min Read
रत्नागिरी

अपघातावर जिद्दीने मात करत गुरुनाथ डोंगळे यांची स्वावलंबनाकडे वाटचाल; आर एच पी फाउंडेशनतर्फे मिळाली ‘निओमोशन’ इलेक्ट्रॉनिक गाडी

3 Min Read
रत्नागिरी

मालगुंडची कन्या रसिका पवार करणार स्टॅचू ऑफ युनिटीवरील राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यात महाराष्ट्राच्या लावणी पथकाचे नेतृत्व 

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?