ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक
रत्नागिरी

रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक

Gramin Varta
Last updated: September 15, 2026 8:48 pm
Gramin Varta
67 Views
Share

रत्नागिरी : शहर परिसरात अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान काजरघाटी धार परिसरात एका संशयिताला गांजासह ताब्यात घेण्यात आले. रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली. संशयिताकडून २ किलो १०० ग्रॅम गांजा तसेच दुचाकी असा एकूण १ लाख ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

इम्रान मोहम्मद काझी, रा. गवळीवाडा, रत्नागिरी, असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण पथक काजरघाटी धार भागात नियमित गस्त घालत होते. त्यावेळी शाईन दुचाकी क्रमांक एमएच-०८-बीबी-६७३६ वरून जाणारी व्यक्ती पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी त्याला अडवून विचारपूस केल्यानंतर अंगझडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्याकडे २ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.

पोलिसांनी गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी ताब्यात घेतली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ८० हजार ८०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी अरांक्षा यादव, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अभिजित थोरात, पोलिस निरीक्षक विवेक पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस कर्मचारी दिपू साळवी, शांताराम झोरे, अमित पालवे, दिनेश आखाडे आणि भालचंद्र मयेकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

भोके ते जयगड नवीन रेल्वे मार्ग होणार; जयगड-सातारा जोडणीचाही विचार

Gramin Varta
3 Min Read

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

Gramin Varta
2 Min Read

सोनिया गांधींच्या 1980 मधील मतदार यादीतील नावाचे प्रकरण पुन्हा न्यायालयात

Gramin Varta
2 Min Read

शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मजगावच्या इब्जी कुटुंबाचा शैक्षणिक वारसा कायम; तीन डॉक्टरांनंतर सलमा इब्जीचे नर्सिंग क्षेत्रात यश

1 Min Read
रत्नागिरी

आधीच्या कर्जातून मुक्ती; नव्या कर्जासाठी मात्र अडसर

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एटीव्हीएम यंत्र दाखल; प्रवाशांची तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांमधून कायमची सुटका

2 Min Read
रत्नागिरी

जाकादेवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली नर्सरी व गणपती कारखान्याला क्षेत्रभेट

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?