ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 9:06 am
Gramin Varta
36 Views
Share

आटपाडी: सांगली जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या गळवेवाडी येथील अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचार आणि हत्या प्रकरणात विटा सत्र न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेत ७० वर्षीय आरोपी शिवाजी कोंडीबा काळेल याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यासोबतच अन्य दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांमध्येही आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश रविकरण भागवत यांच्या न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला असून, सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील आरती आनंद देशपांडे-साठविलकर यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आरोपीला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्यात निर्णायक ठरला.

गळवेवाडी परिसरातून ७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी चारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी तिचा कसून शोध घेऊनही ती सापडली नाही; मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी गळवेवाडीतील जगमाईच्या विहिरीत तिचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली होती. वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदन अहवालात मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. घटनेनंतर सुमारे सहा महिने मारेकऱ्याचा कोणताही सुगावा पोलिसांना लागत नव्हता. दरम्यानच्या काळात २६ जुलै २०१८ रोजी अन्य दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी काळेलविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या दुसऱ्या प्रकरणाच्या तपासात पीडित मुली आणि त्यांच्या आईचे न्यायालयात कलम १६४ अंतर्गत नोंदवलेले जबाब हत्येच्या गूढाचा उलगडा करणारे ठरले. ७ जानेवारी रोजी मृत मुलीसोबत काळेल उपस्थित असल्याची खात्रीशीर माहिती या जबाबातून समोर येताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून काळेलला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी केले.

पोलिसांच्या सखोल तपासात आरोपीने हत्येनंतर मृतदेह लपवून तो विहिरीत फेकत पुरावे नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या लोखंडी कणगी आणि चादरीवरील टिकली पीडित मुलीच्या आजी-आजोबांनी ओळखली, तर कोल्हापूर येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या फॉरेन्सिक अहवालात लोखंडी कणगीमध्ये मानवी रक्ताचे अंश आढळून आल्याने आरोपीच्या गुन्ह्याला भक्कम पुष्टी मिळाली. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने तपासलेले एकूण १९ साक्षीदार, प्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब आणि वैज्ञानिक पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला तिन्ही प्रकरणांत दोषी ठरवले. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येसाठी फाशी तर इतर दोन मुलींवरील अत्याचारासाठी मरेपर्यंत जन्मठेप अशी शिक्षा सुनावून न्यायालयाने पीडितेला न्याय दिला असून, या निकालाचे संपूर्ण सांगली जिल्ह्यातून स्वागत होत आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दाभोळ एसटी स्थानकाजवळ संशयास्पदरीत्या वावरणारा तरुण ताब्यात

Gramin Varta
1 Min Read

Beyond Numbers, Exploring the Intricate Patterns of the Universe

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

एसआयआर प्रकरणी स्पष्टीकरण; सर्व निर्णय एकमताने घेतले- निवडणूक आयोग

Gramin Varta
4 Min Read

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाची धुरा ‘गोल्ड मेडलिस्ट’ सीमा पाहूजा यांच्याकडे; सीबीआयकडून जुन्या कागदपत्रांची नव्याने झाडाझडती सुरू

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी ‘चलो दिल्ली’; १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन

4 Min Read
महाराष्ट्र

‘दुःखी कसं राहायचं?’ केतनच्या मृत्यूनंतर सियाचा ChatGPTला सवाल; चार्जशीटमधील उल्लेखाने खळबळ

3 Min Read
महाराष्ट्र

अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

3 Min Read
महाराष्ट्र

मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?