ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: राजापूर: एसटी बसमधून महिलेच्या बॅगेतील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » राजापूर: एसटी बसमधून महिलेच्या बॅगेतील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
राजापूर

राजापूर: एसटी बसमधून महिलेच्या बॅगेतील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 2:03 pm
Gramin Varta
71 Views
Share

राजापूर : पुणे-राजापूर एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या रॅकवर ठेवलेल्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने तब्बल २ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी राजापूर तालुक्यात घडली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुजा प्रशांत कांबळे (वय ३२, मूळ रा. पासार्डे, ता. करवीर, जि. कोल्हापूर, सध्या रा. जैतापूर, ता. राजापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे या २० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान पुणे-राजापूर एसटी बस क्रमांक एमएच १४ बीटी २२७२ मधून कोल्हापूर ते राजापूर असा प्रवास करीत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी आपली काळ्या रंगाची व्हेनस कंपनीची बॅग बसमधील रॅकवर ठेवली होती. राजापूर तालुक्यातील प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या परवानगीशिवाय लबाडीच्या उद्देशाने बॅग चोरी करून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये २५ ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाचे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन टॉप्स, ५ ग्रॅम वजनाची ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि २.५ ग्रॅम वजनाची १७ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची अंगठी यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत २ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी २० सप्टेंबर रोजी रात्री ९.०९ वाजता तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २५२/२०२६ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रायगड – भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा; तरुण रक्तबंबाळ

Gramin Varta
1 Min Read

Inside Amazon’s Bold Vision for the Future of Shipping

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी: अरेबियन समुद्रात इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू; जयगड सागरी पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

Future Changes Shape: Express Yourself with Galaxy Z Flip

7 Min Read
राजापूर

गणपती सुट्टीत शिक्षक दाम्पत्य गावी गेले अन् पाचलमध्ये घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

2 Min Read
राजापूर

‘जैतापूरचा राजा’ गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’; महिला शेतकरी सन्मान योजनेसह शासकीय योजनांचे मार्गदर्शन

2 Min Read
राजापूर

The Must-Have Application of the Year Charts with Innovation

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?