ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग; प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग; प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू
राजापूर

जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग; प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 6:59 pm
Gramin Varta
203 Views
Share

राजापूर / तुषार पाचलकर : राजापूर तालुक्यातील काजिर्डा येथे प्रस्तावित असलेल्या जामदा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, बुडीत क्षेत्रातील जमिनींच्या मोबदल्याचे वाटप सुरू झाले आहे. काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून जमिनीचा मोबदला मिळण्यास सुरुवात झाल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रक्रियेला आता चालना मिळाली आहे. भूसंपादनासोबत पुनर्वसनाची कार्यवाहीही वेगाने पुढे नेण्यात येत आहे.

जामदा प्रकल्पाच्या भूसंपादनात काजिर्डा आणि राणेवाडी या दोन महसुली गावांतील जमिनींचा समावेश आहे. या दोन्ही गावांमधील संबंधित मिळकतींचे संपादन गेल्या काही वर्षांपासून रखडले होते. मात्र, प्रशासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत बैठका घेतल्या. त्यांच्या अडचणी आणि विविध शंकांवर चर्चा करून त्यांचे निरसन करण्यात आल्यानंतर भूसंपादनाच्या कामाला वेग आला आहे.

काजिर्डा गावातील सुमारे २०२ हेक्टर, तर राणेवाडी येथील सुमारे ३३ हेक्टर जमीन प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या सहकार्यामुळे दोन्ही गावांतील बुडीत क्षेत्रापैकी सुमारे ७५ हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. ३० जून २०२६ पूर्वी या क्षेत्राची मोजणी पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित जमिनींच्या मोजणीसाठीही प्रशासनाला प्रकल्पग्रस्तांकडून सहकार्य मिळत आहे.

प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठीही शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. जलसंपदा विभागामार्फत मौजे मूर येथील ‘मूर पुनर्वसन सांडवा’ प्रस्तावांतर्गत सुमारे ३३ हेक्टर जमीन, तर काजिर्डा येथील ‘ब्राम्हणखोरे पुनर्वसन गावठाण’ प्रस्तावांतर्गत सुमारे २६ हेक्टर क्षेत्र शासनाकडून अधिग्रहित करण्यात येत आहे. यापैकी काही प्रकल्पग्रस्तांना मोबदला वितरित करण्यात आला असून, उर्वरित लाभार्थ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुनर्वसनाच्या अनुषंगाने शासनाच्या नियमानुसार प्रकल्पग्रस्तांना आवश्यक सोयी-सुविधांसह भूखंड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे जमिनींचे संपादन पूर्ण करण्याबरोबरच पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत संयुक्त मोजणी आणि मोबदला वाटपाला सुरुवात झाल्याने प्रकल्पाच्या पुढील अंमलबजावणीसाठी सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जात असून, भूसंपादन आणि पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. मोबदला वाटप सुरू झाल्याने प्रकल्पग्रस्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी ४८ तासांचा इशारा; एसआयआर मुद्यावरून ‘कॉक्रोच जनता पक्ष’ आक्रमक

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
2 Min Read

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवात बाजारपेठेत १०० कोटींहून अधिक रकमेची आर्थिक उलाढाल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

जैतापूर येथे भरधाव कारची समोरून धडक; दोन्ही वाहनांचे नुकसान

1 Min Read
राजापूर

साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

2 Min Read
राजापूर

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

1 Min Read
राजापूर

Tech-Powered Future Updates on the Frontlines of Change

Sponsored by

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?