ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेर्डीत तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेर्डीत तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
चिपळूण

खेर्डीत तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 8:05 am
Gramin Varta
Share

चिपळूण (प्रतिनिधी): ‘खेर्डीचा राजा’ विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळ, खेर्डी-चिपळूण यांच्या वतीने स्व. सौ. नेहा अजित दाभोळकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली चिपळूण तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी खेर्डी-विठ्ठलवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत सुमारे ८५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. खेर्डीत प्रथमच अशा स्वरूपाच्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक अनिलशेठ दाभोळकर, डॉ. अजित दाभोळकर, जिल्हा बँकेच्या संचालिका दिशा दाभोळकर, मंडळाचे आधारस्तंभ दशरथशेठ दाभोळकर, माजी उपसरपंच अभिजीत खताते, डॉ. रजत दाभोळकर, डॉ. श्रुती दाभोळकर, राकेश दाभोळकर, रियाज खेरडकर, प्रणाली दाभोळकर आदींच्या उपस्थितीत झाले.

स्पर्धा इयत्ता पहिली ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला अशा तीन गटांत घेण्यात आली. पहिली ते सातवी गटात मार्मिक मांडके, निलेश भाटी, वेदांत शिंदे, श्रीराज चांदे व अर्णव कांबळे यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविले. आठवी ते दहावी गटात श्लोक घाग, विपिन सावंत, सोहम अभ्यंकर, अनुष्का विश्वकर्मा व आदित्य कांबळे यांनी यश मिळविले. खुल्या गटात साहस नारकर, प्रवीण सावर्डेकर, ओम चव्हाण, वैभव गुरव व खुशी विश्वकर्मा यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले.

विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सर्वात लहान खेळाडू जुई देवळेकर व शर्विल वरवाटकर, तसेच सर्वात ज्येष्ठ खेळाडू गिरीश करमरकर व स्वरदा खोत यांनाही विशेष सन्मान करण्यात आला. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

बक्षीस वितरण सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, डॉ. रजत दाभोळकर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. डॉ. रजत दाभोळकर यांनी आपल्या मातोश्री स्व. नेहा अजित दाभोळकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पुरस्कृत केली होती.

स्पर्धेचे तांत्रिक सहकार्य प्रवीण सावर्डेकर, रश्मी प्रवीण सावर्डेकर व प्रतिरंग चेस ॲकॅडमी, मार्कंडी यांनी केले. पंच म्हणून श्रीहास नारकर व साहस नारकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन झाल्याने पालक व स्पर्धकांनी समाधान व्यक्त करून दरवर्षी अशा स्पर्धेचे आयोजन करण्याची मागणी केली. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष शशांक भिंगारे, खजिनदार बाळू कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी विमानतळ आयएलएससाठी घरे व मंदिरे पाडणार नाही; बाधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत दमण मॉडेलचा पर्याय तपासण्याचे आदेश

Gramin Varta
2 Min Read

गणेशोत्सवात साकारली ‘श्री समर्थ बैठक’; वनगुळे-सुतारवाडीतील पंकज पांचाळ यांच्या कलाकृतीने वेधले लक्ष

Gramin Varta
2 Min Read

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार १२ हजार रुपये

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी २.० पोर्टल तातडीने सुरू करा

2 Min Read
चिपळूण

अवघ्या ५० मीटरच्या भरावाअभावी चिपळूणच्या उड्डाणपुलाची प्रतीक्षा लांबली; सणासुदीच्या गर्दीमुळे काम थांबले, जोडरस्ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

2 Min Read
चिपळूण

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

चिपळूण

Apple’s iPhone Revolution Takes a Green Turn with Sustainable Materials

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?