ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : बगदादी चौकातील पान दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; गुटखा व पानमसाला जप्त
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : बगदादी चौकातील पान दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; गुटखा व पानमसाला जप्त
रत्नागिरी

रत्नागिरी : बगदादी चौकातील पान दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; गुटखा व पानमसाला जप्त

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 4:40 pm
Gramin Varta
217 Views
Share

रत्नागिरी: शहरातील मजगाव रोडवर असलेल्या बगदादी चौकातील एका पान दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने अचानक छापा टाकून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे. मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या या पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि साठा केल्याप्रकरणी संबंधित दुकानदाराविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोकणनगर बस स्टॉपजवळ, बगदादी चौक येथील ‘अब्दुल पान शॉप’ (७८०/k/१८२) मध्ये शासनाने बंदी घातलेला गुटखा आणि पानमसाला छुप्या पद्धतीने विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्याआधारे २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती व्यंकटेश घरत (वय ३९ वर्षे) यांनी पथकासह या दुकानावर छापा टाकला. या तपासणीदरम्यान मानवी आरोग्याला अपायकारक ठरणारा २ हजार ९६४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू व पानमसाल्याची ३ पाकिटे आणि १५७ पाऊच आढळून आले, जे अधिकाऱ्यांनी तत्काळ जप्त केले.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी अब्दुल कादिर (वय ३१ वर्षे, रा. बगदादी चौक, कोकणनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. बंदी असतानाही अशा प्रकारे छुप्या पद्धतीने अमली घटकांची विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5428564
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

वनप्लसचा बजेट स्मार्टफोन ‘एन६ लाइट ४जी’ लाँच

Gramin Varta
3 Min Read

हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ उत्साहात संपन्न; समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

Gramin Varta
2 Min Read

Profiling the Visionaries Behind Cutting-Edge Startup Ventures

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

दिवाळी सणासाठी कोकण रेल्वे मार्गावर १२ विशेष गाड्यांची घोषणा

2 Min Read
रत्नागिरी

गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड बंधनकारक; मंदिर परिसरात जनजागृतीपर फलक

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मच्छिमारांचे प्राण वाचवणाऱ्या ७ जणांचा सत्कार

2 Min Read
रत्नागिरी

गणेश विसर्जनाहून परतलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; जुवे येथे सार्वजनिक विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?