ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळुणात बाप्पाला भावपूर्ण निरोप; १४ सार्वजनिक तर ३ हजार ९६५ घरगुती गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळुणात बाप्पाला भावपूर्ण निरोप; १४ सार्वजनिक तर ३ हजार ९६५ घरगुती गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन
चिपळूण

चिपळुणात बाप्पाला भावपूर्ण निरोप; १४ सार्वजनिक तर ३ हजार ९६५ घरगुती गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 8:11 am
Gramin Varta
12 Views
Share

चिपळूण: गेल्या दहा दिवसांपासून भक्ती, उत्साह आणि मांगल्याच्या वातावरणात रममाण झालेल्या चिपळूण शहरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला अत्यंत भावूक वातावरणात निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा दणदणाट, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि गुलालाची मुक्त उधळण करत शहरातील १४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह तब्बल ३ हजार ९६५ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गगनभेदी जयघोषाने संपूर्ण चिपळूण शहर दुमदुमून निघाले होते.

विसर्जनानिमित्त शहरातील वाशिष्ठी आणि शिव नदीकिनारी गणेशभक्तांचा मोठा जनसागर उसळला होता. बाजारपूल, खेंड बावशेवाडी नदी, बहादूरशेख नाक्याजवळील वाशिष्ठी नदी, पाग येथील शिव नदीकिनारा तसेच गांधारेश्वर येथील प्रमुख विसर्जन घाटांवर सायंकाळच्या सुमारास भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. विसर्जनस्थळांवर पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा व आरत्या करण्यात आल्या; विशेषतः महिला वर्गाने भावपूर्ण डोळ्यांनी लाडक्या बाप्पाची आरती ओवाळून निरोप दिला.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने पारंपरिक वाद्यवृंदांच्या तालावर भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणाईचा उत्साह आणि भक्तांचा जयघोष यामुळे नदीकाठचा परिसर पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. दहा दिवसांच्या चैतन्यमय आणि आनंददायी उत्सवाची सांगता करताना प्रत्येक भक्ताच्या मनात निरोपाचे दुःख आणि आगामी वर्षातील आगमनाची आतुरता स्पष्टपणे जाणवत होती.

Total Visitors :

5428488
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Keyboard Startup Introduces Innovative Layout for Enhanced Productivity

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या १३ हजार ४० घरगुती बाप्पांना भावनिक निरोप

Gramin Varta
2 Min Read

वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार

Gramin Varta
2 Min Read

AI Unleashed Exploring the Future of Machine Learning and Robotics

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

चिपळूण

सावर्डे-नायशी फाट्यावर एसटी बसची कारला धडक; मुलगी किरकोळ जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read
चिपळूण

चिपळूण : गणपती आरतीनंतर जमिनीच्या वादातून राडा; नांदगावात दोघांना मारहाण

2 Min Read
चिपळूण

पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका

1 Min Read
चिपळूण

गणेश चतुर्थीपूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?