ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड तालुक्यातील सहकार क्षेत्राचा स्तुत्य उपक्रम; ‘सेवा संकल्प अभियाना’तून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचे किराणा सामान सुपूर्द
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड तालुक्यातील सहकार क्षेत्राचा स्तुत्य उपक्रम; ‘सेवा संकल्प अभियाना’तून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचे किराणा सामान सुपूर्द
खेड

खेड तालुक्यातील सहकार क्षेत्राचा स्तुत्य उपक्रम; ‘सेवा संकल्प अभियाना’तून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचे किराणा सामान सुपूर्द

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 8:20 am
Gramin Varta
12 Views
Share

खेड: महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ उपक्रमाचे औचित्य साधत सहकार विभागाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खेड आणि खेड तालुका नागरी सहकारी पतसंस्था संघ (फेडरेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने असोंड येथील संत गाडगेबाबा भटक्या व विमुक्त जाती माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी दोन महिन्यांचा किराणा नुकताच सुपूर्द करण्यात आला. विद्यार्थ्यांची वाढ आणि सर्वांगीण विकास सकस आहारावर अवलंबून असतो, ही संवेदनशीलता ओळखून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या विकासात सहकार क्षेत्राला आपला खारीचा वाटा उचलता आला, ही अत्यंत समाधानाची बाब असल्याचे या प्रसंगी मान्यवरांनी नमूद केले. या मदत वाटप कार्यक्रमाला खेडच्या सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) योगिता मुरडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय खेड तालुका नागरी सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष वसंत पिंपळकर, कार्याध्यक्ष अभिनय महाजन, उपाध्यक्ष संदीप मोदी, सचिव रमाकांत पाटील, संचालक तथा श्री संतसेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप तांबे, जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पाटील, सदस्या श्रावणी आंबेडे आणि स्नेहा हळदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नेटके नियोजन व उपस्थितांचे आभार आश्रमशाळेचे अधीक्षक संतोष हांडे यांनी मानले. या वेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वंचित घटकांतील विद्यार्थ्यांप्रती सहकार विभागाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे आश्रमशाळेतील मुलांच्या आरोग्याला व आहाराला मोठा हातभार लागला आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नायर रुग्णालयाच्या कॅन्टीनसह सात नामांकित आस्थापनांचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाचा दणका

Gramin Varta
2 Min Read

चिवेलीतील ३३ लाखांच्या पेयजल योजना घोटाळ्यात कारवाईला टाळाटाळ; संतप्त ग्रामस्थांची पाणी पुरवठा विभागावर धडक, १० दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन

Gramin Varta
2 Min Read

घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर ८५ वर्षीय वृद्धाचा लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Gramin Varta
2 Min Read

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

खेड

खेड: शिंगरी बौद्धवाडीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या

1 Min Read
खेड

खेड : संगलट येथून २४ वर्षीय तरुणाचे अपहरण

1 Min Read
खेड

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

1 Min Read
खेड

खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?