ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गोवळकोटच्या ऐतिहासिक लढाई स्मरण दिनानिमित्त ३ ऑक्टोबरला विशेष कार्यक्रम
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गोवळकोटच्या ऐतिहासिक लढाई स्मरण दिनानिमित्त ३ ऑक्टोबरला विशेष कार्यक्रम
चिपळूण

गोवळकोटच्या ऐतिहासिक लढाई स्मरण दिनानिमित्त ३ ऑक्टोबरला विशेष कार्यक्रम

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 9:46 am
Gramin Varta
64 Views
Share

चिपळूण : गोवळकोट  येथे ५ ऑक्टोबर १७३३ रोजी झालेल्या ऐतिहासिक रणसंग्रामाच्या स्मरणार्थ येत्या शनिवारी, दि. ३ ऑक्टोबर रोजी चिपळूण येथे विशेष लढाई स्मरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

चिपळूणजवळील गोविंदगड किल्ल्यावर ५ ऑक्टोबर १७३३ रोजी मोठा संघर्ष झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानुसार मराठा सैनिक आणि सिद्धी (सिद्धी सात) यांच्यात झालेली ही निकराची झुंज होती. या युद्धादरम्यान सरनोबत नरवीर आनंदराव गोळे आणि त्यांच्या १० बंधूंनी स्वराज्यासाठी अभूतपूर्व शौर्य दाखवत बलिदान केले.

गोवळकोटच्या ऐतिहासिक भूमीत घडलेल्या या रणसंग्रामातील शौर्य, पराक्रम आणि बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात ‘गोवळकोटचा रणसंग्राम – ५ ऑक्टोबर १७३३ ची रक्तरंजित पहाट’ हा विशेष ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. सांखवाळ (गोवा) येथील राधेकृष्णा एन्टरटेन्मेंट प्रस्तुत महिला नाट्यकर्मींच्या वतीने हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. गोवळकोटच्या रणभूमीवरील ऐतिहासिक प्रसंग, वीरांचा पराक्रम, संघर्ष आणि स्वराज्यासाठी केलेला त्याग नाट्यरूपातून साकारण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पराक्रमी सरनौबत आनंदराव गोळे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे. गोवळकोटच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे आणि या रणसंग्रामाची शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी, तरुण तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लढाई स्मरण दिन आणि विशेष ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरवीर पिलाजीराव गोळे प्रतिष्ठान आणि राजे सामाजिक प्रतिष्ठानने केले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गुहागर : निवोशी-भेलेवाडीत दोन महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य; गणेशोत्सवातही स्ट्रीट लाईट बंद असल्याने ग्रामस्थांचे हाल

Gramin Varta
1 Min Read

Traversing the Wonders of Earth’s Diverse and Complex Ecosystems

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

दाभोळ प्रकल्पातील वापरात नसलेली २०० हेक्टर जमीन मूळ शेतकऱ्यांना परत करा

Gramin Varta
2 Min Read

मंडणगड व खेडशी येथून दोघे बेपत्ता; शोध घेण्यासाठी पोलिसांचे नागरिकांना आवाहन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

Keyboard Startup Introduces Innovative Layout for Enhanced Productivity

7 Min Read
चिपळूण

Exploring the Diverse Landscape of Emerging Business Pioneers

7 Min Read
चिपळूण

चिपळूण: खेर्डी एमआयडीसीत संशयास्पदरीत्या फिरणारा तरुण तांब्याच्या तारांसह अटकेत

1 Min Read
चिपळूण

Apple’s iPhone Revolution Takes a Green Turn with Sustainable Materials

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?